Tuesday, May 13, 2025
Homeवणीकळमणा (खुर्द)येथे प्रक्षेत्रास भेट देत शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन…..

कळमणा (खुर्द)येथे प्रक्षेत्रास भेट देत शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन…..

•“माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी”हा स्तुत्यमय उपक्रम

अजय कंडेवार,वणी:- कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या, नैराश्य व त्यातुन होणान्या आत्महत्या या मागील कारणे त्याकरीता सुलभ व प्रभावी कृषि विषयक धोरण करणेकरीता यापार्श्वभुमीवर शेतकऱ्याना येणाऱ्या अडचणी प्रश्न याबाबत शेतकऱ्याकडून प्रशासनाने समजुन घ्यावेत व त्यावर कोणत्या उपाययोजना करुन धोरणात्मक निर्णय घ्यावेत यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांनी संपुर्ण एक दिवस शेतकऱ्यासोबत व्यथीत करुन “माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी” हा उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने वणी तालुक्यातील कळमणा खु. या गावात उपविभागीय कृषि अधिकारी, पांढरकवडा जगन राठोड, वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. एन. डि. पार्लावार, सहाय्यक प्राध्यापक अंजली गहरवार यांनी सुनिल शंकर दुमणे यांचे कपाशी पिकाच्या प्रक्षेत्रास भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शेतकऱ्याच्या अडचणी व प्रश्न जाणुन घेतले.

उपस्थित शेतकऱ्यांना पतपुरवठा व सामाजिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार पिक वैविधीकरण, शेतकऱ्यांना मार्केटला जोडणे या मुख्य विषयासोबतच इतर शेतीविषयक प्रश्नामध्ये पिकाच्या उत्पादन वाढीकरीता सुधारीत बियाणे वाटप, शेतीशाळा, प्रशिक्षण, पिकसंरक्षण क्रॉपसॅप अंतर्गत पिक सल्ला, कृषि यांत्रीकीकरण, नॅनो युरीया वापर, शेततळे, ठिबक व विद्राव्य खते, माती परीक्षण, शास्त्रज्ञ संवाद, सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती, शेतकरी रोपवाटिका, फळबाग लागवड, शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन करणे / बळकटिकरण, स्मार्ट प्रकल्प, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना, कृषि माल तारण योजना, पि.जी.एस. अंतर्गत सेंद्रीय शेती नोंदणी, ब्रॅन्डींगसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत करणे इ. विषयाबाबत शेतकऱ्यांसोबत वरील विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच सध्याची मुख्यपिकांची पिक परीस्थीती त्यावरील किड व रोग सर्वेक्षण व एकात्मिक उपाययोजना, रासायनिक किटकनाशके फवारणी करतांना विषबाधा होऊ नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय व प्रथमोपचार, फळपिक लागवड व त्याचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी वणी आनंद बदखल यांनी केले. संचालन डोमेश्वर बरडे व आभार किशोर हटवार यांनी केले यावेळी सरपंच पुष्पा मधुकर क्षिरसागर, ग्रा.पं. सदस्य राहुल क्षिरसागर, मंगेश येट्टे, प्रफुल दुमणे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धम्मपाल बन्सोड, कृषी सहाय्यक विश्वास फुलमाळी, देवेंद्र पाचभाई तसेच कृषि विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी तसेच मोठया संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments