•“माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी”हा स्तुत्यमय उपक्रम
अजय कंडेवार,वणी:- कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या, नैराश्य व त्यातुन होणान्या आत्महत्या या मागील कारणे त्याकरीता सुलभ व प्रभावी कृषि विषयक धोरण करणेकरीता यापार्श्वभुमीवर शेतकऱ्याना येणाऱ्या अडचणी प्रश्न याबाबत शेतकऱ्याकडून प्रशासनाने समजुन घ्यावेत व त्यावर कोणत्या उपाययोजना करुन धोरणात्मक निर्णय घ्यावेत यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांनी संपुर्ण एक दिवस शेतकऱ्यासोबत व्यथीत करुन “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने वणी तालुक्यातील कळमणा खु. या गावात उपविभागीय कृषि अधिकारी, पांढरकवडा जगन राठोड, वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. एन. डि. पार्लावार, सहाय्यक प्राध्यापक अंजली गहरवार यांनी सुनिल शंकर दुमणे यांचे कपाशी पिकाच्या प्रक्षेत्रास भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शेतकऱ्याच्या अडचणी व प्रश्न जाणुन घेतले.