•सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार….
देव येवले,झरी (वा.) :- तालुक्यातील दिग्रस येथील तरुण देशाच्या सेवेकरिता भारतीय सैन्यात ३१ वर्ष 6 महिने देशाच्या विविध ठिकाणी सेवा कर्तव्य पार पाडून सेवा निवृत्त होऊन अनिलरेड्डी सुरकुंटवार हे स्वगृही परत आले.
त्यानिमित्याने २ ऑक्टोंबरला गांधी जयंती निमित्त दिग्रस ग्रामपंचायत व गावकऱ्यामार्फत मोठ्या उत्साहात स्वागत करीत संपूर्ण गावातून डफडे लावून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकी दरम्यान गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी CRPF चे सेवा निवृत्त सैनिक व दिग्रस गावाचे सुपुत्र अनिलरेड्डी सुरकुंटवार यांचा सत्कार गावचे सरपंच निलेश येल्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री याच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून फोटोस हारार्पण सेवानिवृत्त सैनिक अनिलरेड्डी सुरकुंटवार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी य.जि.म.बँकचे संचालक राजू येल्टीवार, PSI टेंभरे साहेब, सरपंच निलेश येल्टीवार, माजी सरपंच मारोती तुमाने, पोलीस पाटील नंदुभाऊ कुंटलवार, नरसिंगरेड्डी बाडलवार, महेशरेड्डी बाडलवार, गंगारेड्डी सुरकुंटवार, जालंदरजी गड्डमवार, अशोकरेड्डी सूरकुंटवार, सुरेश पालावार, सतीश रासरवार, विलास मुत्यलवार, नंदकुमार लंकावार, रवी मुके, सैनिकाच्या परिवारासह गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.