•अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करणारे यशस्वी ठाणेदार म्हणून विशेष ओळख.
•मागील 15 वर्षानंतर यशस्वीरित्या कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे ठाणेदार ठरले.
अजय कंडेवार,वणी :- शिरपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गजानन करेवाड यांचा ठरलेला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करीत जिल्हा नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. गेल्या दोन महिन्याभरापासून बदलीची चर्चा सुरु होती. शिरपूर ठाण्यासाठी कोण बाजी मारतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अखेर दि.14 सप्टें. गुरुवारी या संदर्भातील आदेश आले आणि संजय राठोड यांची शिरपूर ठाणेदार पदी नियुक्ती तर शिरपूर ठाणेदार यांची यवतमाळ नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले.
शिरपूर पोलीस ठाण्यात असा धडाकेबाज अधिकारी म्हणून आजपर्यंत अधिक काळ कोणीच काढला नाही. मात्र गेल्या दोन वर्षापूर्वी शिरपूर ठाण्यात आलेले API गजानन करेवाड यांनी शिरपूर परिसरात अत्यंत कुशल आणि बंधुभाव जोपासत वचक बसविला. सपोनि गजानन करेवाड यांनी शिरपूर ठाण्याचा कारभार अतिशय योग्य पद्धतीने हाताळला. तपास यंत्रणा कार्यक्षम ठेवत गुन्हे आटोक्यात आणले. त्या प्रमाणेच घडलेल्या अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात आले. हत्या, चोरी आणि अन्य गुन्ह्यातील आरोपींना शिताफीने ताब्यात घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले.अनेक धडाकेबाज कारवाया केल्या. अनेक मोठ मोठ्या गुन्हातील आरोपींचा मुसक्या दाबल्या .ठाणेदार गजानन कारेवाड यांनी वेळोवेळी तपास कौशल्य दाखवून “गुन्ह्यांना माफी नाही” हे देखिल सिद्ध करून दाखविले.
शिरपूर ठाण्यात विविध समाजाच्या बैठका घेऊन सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली.गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न करीत सामान्य माणसाला जवळ करून त्याच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी बाळगली. प्रत्येक घटकसोबत मैत्रीपूर्ण संबंध जोपासले. कार्यकाळ खरच वाखाणण्याजोगा असून ज्या दिवशी पासून शिरपूर येथे सेवेवर रूजू झाले तेव्हापासून शिरपूर हद्दीत आमुलाग्र बदल घडून आला होता, सर्व सामुदायिक कार्यक्रम असो सांकृतिक असो, कायदेविषयक शिबीर असो त्यांचा मोलाचा सहभाग असायचा तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर त्यांचा जबरदस्त दरारा होता, त्यांच्या कारकिर्दीत त्यांचा चमूनेही चांगले प्रकारे कामगिरी केली.सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी समान वागणूक देवून कधीच, भेदभाव केला नाही. विशेषतः सामान्य लोकांचा चोरीला गेलेला माल चोरांकडून हस्तगत करून शंभर टक्के रिकव्हरी याच ठाणेदाराने केलें व क्लिष्ट गुन्ह्याची अनेकदा उकल करून गुन्ह्याचा छडाही लावण्यात अनेकदा यश आले. त्यामूळे पोलीस स्टेशन परिसरात शांतता प्रिय वातावरण निर्माण झाले. शीघ्रगतीने तपास करणारे अव्वल ठाणेदार म्हणूनही वेगळी छाप निर्माण केली. त्यामुळें जनसामान्यात पोलिसांचा आदरही वाढू लागला होता.
तसेच तालुक्यातील सर्वच तक्रार कर्त्यांचे समाधान करून सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला. सामान्यांना कधीच त्रास होऊ दिला नाही तर, गुन्हेगारांची गय सुध्दा केली नाही. त्यांच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात सर्वच धर्मियांच्या भावनेचा आदर करत त्यांनी शिरपुर ठाण्यात अत्यंत कुशाग्र बुध्दीने आपले कर्तव्य पार पाडले. त्यांचा बदलीने आदेश येताच शिरपूर ठाण्यात समस्त पोलीस कर्मचारीही भावूक झाले. अश्या धडाकेबाज अधिकाऱ्यांचा हाती काम करायला फार आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना आवडले असाही सुस्कार सोडला….