Tuesday, February 17, 2026
Homeवणीऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला शहर जिल्हा व्हायलाच पाहिजे.

ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला शहर जिल्हा व्हायलाच पाहिजे.

• मानवी हक्क सुरक्षा परिषदेचा निवेदनातून मुख्यमंत्री यांना निवेदनातून घातले साकडे.

विदर्भ डेस्क,वणी : वणी हा जिल्हा व्हावा ही काळाची गरज आहे कारण वणी परिसरात मुबलक अशा कोळसा खाणी, डोलामाईट खाणी व औद्योगिक क्षेत्र म्हणून वणी तालुक्याची ओळख आहे. त्याचप्रमाणे वणी तालुका ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. लोकनायक बापुजी अणे व राम शेवाळकर यांची ही जन्मभूमी आहे. वणी हा ब्रिटीशांच्या काळात जिल्हा होता. वणी परिसरात सर्व मुबलक वास्तू निर्माण होत असल्यामुळे वणी जिल्हा होणे गरजेचे आहे. त्याकरीता मानवी हक्क सुरक्षा परिषदेने वणी उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देत मुख्यमंत्री यांना साकडे घालण्यात आले आहे.

वणी तालुक्यात पांढरकवडा, झरी, मारेगांव, वरोरा, कोरपना या तालुक्याचा समावेश करावा. तसेच विभागीय कार्यालय अमरावती आहे ते नागरीकांना आपल्या कामाकरीता वणीपासून खूप जास्त अंतर (अंदाजे २२० कि. मी.) आहे आणि नागपूर हे अंतर (१३० कि. मी.) आहे म्हणून नागपूर हे विभागीय कार्यालय करावे. कशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, विकेश पानघाटे , श्रीकांत हनुमंते, सुमित्रा गोडे, भाऊसाहेब आसुटकर, अजय चन्ने, सुनिता काळे, प्रमिला चौधरी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments