अजय कंडेवार, वणी : 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होतो. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी ओबीसी समुदायाला घरोघरी गावोगावी संविधान दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्याचे आवाहन केले होते
जनता विद्यालय वणी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, प्रमुख अतिथी गणेश खंडाळकर, सुरेश बरडे , विवेक देशपांडे, सुनील उपरे, सुवर्णा किनाके,प्रमोद पाटील, मोहन कटाईत,अशोक वनकर,लीना चंदे,अरविंद कुळमेथे,प्रदीप गभोळे, जगताप मॅडम,मोहन मोहुर्ले,शुभांगी सपाट, नितीन मांडाळे,वनिता जांभुळकर,मंगला जोगी व बहुसंख्येने लोक प्रामुख्याने उपस्थितीत होते.यावेळी ओबीसी व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद पोडे, प्रास्ताविक विवेक मांडवकर तर आभार प्रदर्शन मत्ते यांनी केले.कार्यक्रमाच्या सरतेशेवटी विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देशीका चे लिखाण करून घेण्यात आले आणि संविधानावर आधारित प्रशमंजुषेचा कार्यक्रम घेण्यात आला.
- ” डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले की, एक दिवस जरी देशात संविधान पूर्णतः लागू झाले तरी या देशातील सर्व समाजघटकांचे उत्थान होईल व देशातील अनेक समस्या निकाली लागेल. संविधान हाच जगण्याचा आधार असून देशातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याची क्षमता ठेवते. तेव्हा संविधान दिन हा राष्ट्रीय सण समजून प्रत्येकांनी असाच घर, कार्यालय, परिसर व समाजातून हा दिवस देशभक्तीच्या भावनेने साजरा करायला हवा.”