•वणी उपविभागात प्रथमच भव्य अशी ही कार्यशाळा..
• वणीत पहिल्यांदाच विदर्भातील ख्यातनाम साहित्यिक व लेखकांचे लाभणार मार्गदर्शन
अजय कंडेवार,वणी:- वणी शहराच्या वसंत जिनिंग सभागृहात उद्या दिनांक 25 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता नवोदित पत्रकार, पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या आणि समाजातल्या जाणत्या वर्गासह शिक्षक, वकील यांच्यासाठी ” एक दिवशीय कार्यशाळेचे ” आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात दि वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष खूलसंगे यांचे हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे कार्यशाळेचे अध्यक्ष असणार आहेत. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे संचालक पी .एस आंबटकर, वणी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, तसेच रंगनाथ स्वामी अर्बन निधीचे संचालक संजय खाडे यांच्या विशेष उपस्थितीत कार्यशाळा संपन्न होणार आहे.
डिजिटल मिडिया म्हणजेच न्युज पोर्टल आज माध्यमांच्या दुनियेत क्रांती करीत असुन जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना तत्काळ जनतेपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य ह्या माध्यमातून सुरू असून केंद्र शासनाने डिजिटल मिडीयाला मान्यताही दिली आहे.माध्यमात कार्य करताना डिजिटल मिडिया प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी, शुद्धलेखन,पत्रकारिता कायदे तसेच बातम्यांचे अचुक व सुयोग्य विश्लेषण करण्याच्या संदर्भात पत्रकारांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने व्हॉइस ऑफ डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेने आयोजित केले असुन अधिवेशनाच्या माध्यमातून डिजिटल मिडीयाचे अस्तित्व व महत्व प्रभावीपणे पटवून देणे, पत्रकारांचे मजबूत संघटन तयार करणे तसेच डिजिटल पत्रकारांना प्रशिक्षण देणे हा ह्या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे.
“वणी उपविभागात पत्रकार ,वकील , शिक्षक व जाणत्या वर्गासाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेत वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील पत्रकार तसेच पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन ‘व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेने केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 9403456781 ,9422673123, 9738181616,8554036501 ,9011845545.या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.”