•मॅकरून स्कूल येथे महाराष्ट्र दिन साजरा.
अजय कंडेवार,वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस.ई स्कूल येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन ,आंतरराष्ट्रीय कामगार दिन व शाळेचा स्थापना दिवस म्हणून जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित मुख्य अतिथी म्हणून शाळेचे उपसंचालक पियूष आंबटकर यांचा शुभहस्ते ध्वजारोहण वडगाव ब्रांच व सिटी ब्रांच येथे करण्यात आले. गर्वाने माझा महाराष्ट्र म्हणत भररस्त्यात फटाक्यांच्या गजर करण्यात आला.Take a great leap and reach new heights – Piyush Ambatkar (Vice Chairman),Maharashtra Day celebration at Macaroon School.
वडगाव येथे टिपलेले क्षण….
ध्वजारोहण संपन्न होताच लगेचच महाराष्ट्राचे राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा गायले. या प्रसंगी अनेक शिक्षिकानी महाराष्ट्र दिन बाबत अत्यंत चांगल्या रितीने माहितीही दिली व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच” समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण असते.महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास जपत आपल्या पिढीने साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत नवनवी शिखरे गाठावी. असे आवाहन संस्थेचे पियूष पी. आंबटकर यांनी केले.”
या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून शाळेचे उपसंचालक पियूष आंबटकर ,शोभना मॅडम ,अश्विनी ढोले उपस्थित होत्या, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.