•म.न.वा. सेनेकडे वाढतोय युवकांचा कल.
अजय कंडेवार,वणी :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन मनसे नेते राजु उंबरकर यांचा मार्गदर्शनात वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या प्रमूख उपस्थितीत वणी येथील शासकीय विश्राम गृहात दि.30 सप्टे.शनिवार रोजी “शेकडो युवकांनी” महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत जाहीर प्रवेश घेतला.
आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन आणि आगामी काळात पक्षाचे धोरण व पक्ष घराघरात पोहोचण्याकरिता प्रयत्नशील रहावे, असे आवाहन इरशाद खान यांनी उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना केले.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत पक्ष प्रवेश करतांना धनराज येसेकर,पिंटू उखनकर ,आर्या राऊत,निखिल कडूकर विशाल नागमोते ,अंकुश येसेकर,अंकुश येसेकार , प्रणय पचारे,अमर शर्मा,अभी कुंमरे,श्रीकांत पुल्लेवार ,गौरव मांढरे ,गोकुल मुरकुटे,यांच्यासह युवक व अनेक नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.याप्रसंगी आजीद शेख ,शम्स सिद्धीकी, सय्यद युनूस,आयाज खान यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.