•शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी मदत लवकरच.
माणिक कांबळे,मारेगाव:- अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विविध गावांना भेट दिली.
दोन दिवसापूर्वी झालेल्या ढग फुटी नंतरच्या अतिवृष्टीने अनेकांना फटका बसला आहे. घराची पडझड झाल्यामुळे वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तसेच संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे खराब झाली आहे. अनेकांची संसार उघड्यावर आली आहे. त्यामुळे रात्रीची झोप घ्यायची कुठे असा प्रश्न नुकसानग्रस्ता समोर निर्माण झाला आहे.
शेतकऱ्याची शेतीपिके खरडून गेली आहे. यामध्ये वनोजा (देवी)बामर्डा, मार्डी, खैरगांव, दापोरा, कोसारा, केगांव, चानोडा आपटी, दांडगाव, शिवणी, यासह अनेक गावाचा नुकसान नुकसानग्रस्त गावा मध्ये समावेश आहे. या सर्व नुकसान ग्रस्त गावांना आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली आहे.त्यांच्या सोबत भाजप चे दिनकर पावडे, ज्ञानेश्वर चिकटे, प्रसाद ढवस,नगरसेवक वैभव पवार,मंगेश देशपांडे,सुधाकर बोबडे,प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी त्यांनी बामर्डा वनोजा येथील उपसरपंच प्रशांत भंडारी, बामर्डा येथील धनंजय आसुटकर, सरपंच सोयाम, मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच सुधाकर डाहुले, सदस्य सुरेश चांगले, सूरज पंडिले, गणेश कनाके यांची भेट घेतली व गावकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या.
“नुकसान भरपाई तात्काळ मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेला घटनास्थळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. घराच्या नुकसानीसाठी त्यांना 5 हजारा वरून 10 हजार रुपये शासनाने वाढवून दिले आहे.ज्यांचे नुकसान झाले आहे.त्यांनाच अर्थ सहाय्य देण्यात येईल.शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना प्रतिहेक्टरी मदत लवकर मिळेल.”
–आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
(विधानसभा मतदार संघ, वणी)