•पक्षश्रेष्ठींची खेळी हीच नवीन संजिवनी देणार अशी अपेक्षा.
अजय कंडेवार, वणी:- वसंत जिनिंग अँड प्रेसिंग निवडणूक झाली होती. त्यात चौरंगी लढतीत माजी आमदार वामनराव कासावर यांच्या परिवर्तन पॅनलने शेवटच्या क्षणी बाजी मारली आणि 17 पैकी 15 उमेदवार निवडून आणले होते. व शेवटी मंगळवारी दि.22 नोव्हेंबर ला वसंत जिनिंच्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पाडली. त्यात नवीन चेहरा आशिष खुलसंगे यांना अध्यक्ष पदावर पक्षश्रेष्ठींनी विराजमान करीत त्यावर विश्र्वास दाखविला.
विशेष म्हणजे अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात ? हा पेच पक्षश्रेष्ठींना मोठा पडला होता त्यात प्रमोद वासेकर, संजय खाडे व पुरुषोत्तम आवारी यांच्या नावाची काहीं दिवसापासून जोरदार चर्चा सुरु होती मात्र पक्षश्रेष्ठींनी नविनच चेहरा निवडला. आजचा बैठकीत आशिष खुलसंगे अध्यक्ष तर उपाध्यक्ष पदी जय नेमीचंद आबड व कार्यकारी संचालक पदी प्राध्यापक शंकर वऱ्हाटे यांचा नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.



