Tuesday, February 17, 2026
HomeBreaking"आशिष खुलसंगे" ची "Monopoly " आली अंगलट.......

“आशिष खुलसंगे” ची “Monopoly ” आली अंगलट…….

Ajay Kandewar, वणी : तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली वसंत को-ऑप शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लि., वणी पुन्हा एकदा राजकीय घडामोडींनी हादरली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांच्या आदेशानंतर झालेल्या विशेष सभेत, अध्यक्ष आशिष आनंदराव खुलसंगे यांच्यावरील अविश्वास ठराव १७ पैकी तब्बल १४ सदस्यांच्या एकमताने पारित करण्यात आला.या निर्णयाने फॅक्टरीतील “एकाधिकारशाही” कारभाराचा शेवट करत, खुलसंगे यांच्या राजकीय कारकिर्दीवर जणू पूर्णविरामच उमटला आहे.

•१७ पैकी १४ सदस्य एकत्र, खुलसंगे एकटेच

१२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता घेतलेल्या विशेष सभेत सर्व सदस्यांचा सूर एकाच दिशेने होता .“बदल हवा!”अखेर १४ सदस्यांनी ठराव मंजूर करत खुलसंगे यांचा राजकीय गडच कोसळवला.गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले अंतर्गत मतभेद, सत्तासंघर्ष आणि निर्णय प्रक्रियेतील एकतर्फी धोरणांनी संस्थेत असंतोष वाढवला होता. हा अविश्वास ठराव म्हणजे त्या असंतोषाला आलेला अधिकृत शिक्का लागला.

चुकीचा नेतृत्वाने, “आशिष” चे राजकारण संपुष्टात ?

दोन वर्षांपूर्वी वसंत जिनिंगच्या निवडणुकीत माजी अध्यक्षांवर आरोप करीत आशिष यांनी मोठ्या मताधिक्याने अध्यक्षपद पटकावलं होतं. परंतु त्यानंतर त्यांच्या राहणीमानात व स्वभावात बदल, कार्यशैलीत तोऱ्याचा सूर आणि सदस्यांकडे दुर्लक्ष सुरू झाल्याचे बोलले जात होते.“वसंत जिनिंग” च्या निवडणुकीत वाटेल तसे माजी अध्यक्ष आरोप करीत भरघोस मत घेत पदावर बसले.त्यानंतर त्यांचं राहणीमान आणि एखाद्याला कार्यशाहीच्या भाषा मात्र तोऱ्याची.आणि त्यानंतर काहीच दिवसांनी त्यांना तालुका झरी मधून काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली परंतु काँग्रेस अध्यक्ष काही महिने अगोदरच तालुकाध्यक्षपदी सुद्धा काढून घेतला त्यानंतर अविश्वास चालू असलेले जे प्रकरण होतं त्यामध्ये 14 सदस्यांनी एकत्र येत हुकुमशाहीच्या विरोधात जात “आशिष “पत्ताच साफ केला.परंतु यामध्ये विशेष “आशिष” जे नेतृत्व होतं ते “मुरब्बी” नेतृत्व मानला जात होता परंतु शेवटी ते “मुरब्बी” नेतृत्व सुद्धा राजकारणाच्या कोणत्याही परिस्थितीला सांभाळू शकले नाही. म्हणून आजगत त्या नेतृत्वाच सुद्धा राजकारणात संपुष्टात आल्याच बोलल्या जात आहे.हा शेवटी चुकीचं नेतृत्व आणि एकाधिकारशाही मुळे आशिष नावाचा अंत राजकारणातून झालेला आहे.संस्थेतील सर्व व्यवहारांवर एकहाती नियंत्रण, सल्लामसलत न घेणे आणि कार्यकारी सदस्यांचा अपमान. या तक्रारी मागील काही काळापासून चर्चेत होत्या.सदस्यांनुसार, खुलसंगे यांचे नेतृत्व “समूह सहकार”नव्हे तर “वैयक्तिक हुकूमशाही”कडे झुकले होते. परिणामी, संस्थेचा कारभार गोंधळात गेला आणि अखेर सर्वांनी मिळून नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला.कधी वणी तालुक्यातील काँग्रेसचे तेजस्वी चेहरा म्हणून उदयास आलेले आशिष खुलसंगे, काही वर्षांतच दोन महत्त्वाच्या पदांवरून गमावले.एकीकडे काँग्रेस तालुकाध्यक्षपदावरून हटविण्यात आले, तर दुसरीकडे वसंत जिनिंग फॅक्टरीतूनही अविश्वासाने बाहेरचा रस्ता दाखवला.“खुलसंगे यांचे नेतृत्व हे मुरब्बी नव्हे, तर ‘चुकीच्या दिशेने गेलेले’ नेतृत्व ठरले.?

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments