• ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ फाउंडेशनचा हा ही एक नवा उपक्रम
अजय कंडेवार,वणी :- महिला जश्या दागदागिन्यांची जीवापाड काळजी घेतात तशीच आरोग्याची काळजी घेताना दिसत नाहीत. ती त्यानी घ्यावी. आरोग्यच चांगले नसेल तर त्या दागिन्यांचा काहीही उपयोग नाही. म्हणूनच महिलांनी व्यायाम, पौष्टीक आहार व्यवस्थित घेवून आरोग्य सांभाळलं पाहिजे. ‘ती’च कुटुंबाचा आधार असते. ‘ती’च जर आजारानं अंथरूणावर पडली तर सारं कुटुंब कोलमडून जातं. यासाठी त्यांनी योगासनांच्या माध्यमातून, पौष्टीक अन्नधान्य घेवून तब्येत खणखणीत ठेवली पाहिजे, तसेच विधवा प्रथा,रुढी-परंपरा समाजाला कशा घातक आहे त्या बद्दल मार्गदर्शन केले . परिसरातील महीला वर्ग यांना सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनची चळवळ प्रत्येक स्त्री पर्यंत कशी पोहचेल आणि त्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करुन महिलांना न्याय- हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना जागृत करणे हाच उद्देश आहे, असे प्रतिपादन सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनचा अध्यक्षा किरण देरकर यानी केले.काल दिनांक 22 जाने. रविवारी रोजी गुरुदेव सेवा मंडळ (कोरंबी) मारेगांव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हळदी-कुंकू तिळगूळ वाटप समारंभात बोलत होत्या.

तसेच गावातील (आशा सेविका) बबीता गेडाम यांचा सत्कार करण्यात आला.प्रणीता मोहम्मद असलम यांनी प्रास्ताविक मधुन सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन यांच्या कार्याविषयी माहीती दिली.डाॅ.धनश्री जेऊरकर यांनी आयुर्वेदा द्वारे आरोग्याची कशी काळजी घ्यावी यासाठी मार्गदर्शन केले.नीरंजना पायघन/भोयर (उद्योग निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण) यांनी महीलांंना व विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थ प्रणीता असलम,वैशाली देठे, शारदा चिंतकुंटलवार,सुरेखा ढेंगळे,मीनाक्षी मोहिते, (पोलीस पाटील) विशाखा खंडाळकर ,मंजुषा मत्ते, गावातील सर्व महीला भगिनी व गुरुदेव सेवा मंडळ (कोरंबी) मारेगांव यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.गावातील सरपंच, सर्व महीला बचत गट व युवकांनी सहकार्य केले.

