Thursday, May 15, 2025
Homeवणी"आय लव्ह मोमीनपुरा " या अनोख्या फलकाचे थाटात अनावरण

“आय लव्ह मोमीनपुरा ” या अनोख्या फलकाचे थाटात अनावरण

•एकमात्र अश्या सुंदर व आकर्षक फलकाला एकदा नक्कीच बघावे असे आवाहन उपस्थितांनी केले आहे.

अजय कंडेवार, वणी:- पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहू अलैहि वसल्लम यांच्या शुभ जन्मदिनाचे औचित्यसाधून वणी येथील मोमिनपुरा येथे “आय लव्ह मोमीनपुरा ” या एकमात्र सुंदर व आकर्षक फलकाचे अनावरण काल सायंकाळीं 7 वाजता दि.8 ऑक्टो ला शनिवार रोजी फारुख चिनी (ज्येष्ठ समाजसेवक) व आमेर टॉवरचे संचालक जम्मू उर्फ जमीर खान यांचा शुभहस्ते करण्यात आले आहे.

टिपलेले क्षण……….

मागील काही महिन्यांपासून मोमिनपुरा येथील युवकांच्या मनात असलेली एक दुर्मिळ इच्छा अखेर पूर्णत्वास आली .
वणी येथील मोमिनपुरा येथे “आय लव्ह मोमीनपुरा “या नावाचे आगळ वेगळ स्वरूपाचे फलक तयार करण्यात आले. या फलकाचे विशेष ही बाब की, वणीत एकमात्र ,सुदंर , आकर्षक व मनमोहक असा आहे. यातून युवकांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की, प्रत्येकानी प्रत्येक वॉर्डांत यासारखे फलक लावावे व वणी शहराला आधुनिक रूप द्यावें तसेच यामाध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन स्वतःचा वॉर्डातील एकोपा जागृत ठेवावा यामागील हाच महत्वाचं उद्देश आहे.

मोमिनपुरा येथील यूवक मागिल 2 महिन्यापासून अहोरात्र झटत वॉर्डांत मोमीनपूरा नावाचे फलक हे अजमेर शरीफ येथील असणाऱ्या फलकासारखे असायला पाहिेजे अशी जिद्द अखेर जश्ने इद मिलादुंबी या दिवसांचे औचित्य साधून युवकांने पुर्ण केले.

या उद्घाटनाप्रसंगी फारुख चिनी (ज्येष्ठ समाजसेवक) व आमेर टॉवरचे संचालक जम्मू उर्फ जमीर खान, बबलू भाई व मोठया प्रमाणात युवकवर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments