Tuesday, February 17, 2026
HomeUncategorizedआमदाराचे विकासकामे 'झकास'... नगरपरिषद करताहेत 'भकास '..!

आमदाराचे विकासकामे ‘झकास’… नगरपरिषद करताहेत ‘भकास ‘..!

•प्रशासन व मुजोर ठेकेदारांना आवरणे गरजेचे…

अजय कंडेवार,वणी:- वणी नगरपरिषद हे समस्यांचे माहेरघरच बनले आहे यात शंकाच नाही. वणीकर जनता अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करताहेत. अश्यातच विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार विकास कामांचा सपाटाच लावला आहे. यात साई मंदिर ते रेल्वे क्रॉसिंग पर्यंत सुरु असलेले सिमेंट रस्त्याचे काम शहराचे विकासात्मक दृष्टीने फार महत्वाचे आहे.भविष्याच्या वाहतूक समस्या, अतिक्रमण व सांडपाणी वाहून नेण्यासारख्या समस्या यामुळे मार्गी लागणार आहे.मात्र या महत्वाकांक्षी उद्देश्याने निर्माण होत असलेल्या रस्त्याच्या कामात रस्त्याच्या मधात येणाऱ्या पाणी पुरवठा लाईन, त्यावर असलेले लिकेज हे दुरुस्त न करता सुरु असलेले काम हेच नगरपरिषद प्रशासनाची अक्ष्मय चूक आहे. याला नेमका जवाबदार कोण?MLA’s development works ‘Zakas’… Municipal councils are doing ‘Bhakas’..!Administration and major contractors need cover.

रस्त्याच्या मध्यभागी असलेले लिकेज दुरुस्त न करता सिमेंट रस्त्याचे कामं केल्याने रस्ता 6 महिन्यातच फुटला तर नवल वाटणार नाही. मात्र वणीकर जनतेला पुन्हा खड्डेमय गड्यातुन चालावे लागेल यात शंका नाही.यासंदर्भात मुख्याधिकारी नगर परिषद ,पाणी पुरवठा ठेकेदार व रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यांना माहिती देऊन सुद्धा ही घोडचूक बुद्धिपूरस्कर करण्यात आली आहे.

वणी विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठप्प पडलेला विकास आता युती सरकारच्या काळात लवकरच होणार असल्याची माहिती आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी १२ मार्च रोजी सायंकाळी स्थानिक विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.

वणी विधानसभा क्षेत्रासाठी एका वर्षात राज्य शासनाकडून एवढा मोठा निधी इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाला पुढील वर्षात रस्ते विकासासाठी किमान 900 कोटी रुपये आणू असा निर्धार देखील व्यक्त केला तसेच दर्जेदार रस्ते जनतेला देण्याचे वचन दिले.मात्र याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एव्हढया मोठ्या प्रमाणात निधी आणला.क्षेत्रात अनेक रस्ते तयार करणार पण हेच रस्ते भविष्यात खड्डे बनू नये यासाठी प्रशासन व मुजोर ठेकेदारांना आवरणे गरजेचे आहे.

मागील 2महिन्यापासून आम्ही  पाणी प्रश्नाचा बाबतीत व  रस्त्यांचा मध्यभागी असलेल्या पाइप लिकेज संदर्भात मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले. इतकेच नाही तर त्या ठिकानचे फोटोही व्हाट्सअप वर पाठविले. तरीही मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि मुख्याधिकारी वणी साठी असूनही नसल्यासारखेच..या मुख्याधिकारीने हलगर्जीपणाचा मर्यादा ओलांडल्या.अश्या बेजबाबदार C.O चे निलंबन झालेच पाहिजे अशी मागणीही यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा कडे केली आहे “- राजू तुरानकर 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments