•बिरसा मुंडा, शामादादा कोलाम व संविधान दिनाचे औचित्य
देव येवले (विशेष सहसंपादक, झरी): तालुक्यातील बंदी वाढोणा येथे बिरसा मुंडा, शामादादा कोलाम व संविधान दिनाचे औचित्य साधून दिन बहुउद्देशिय संस्था व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेबरला आदिवाशी व आदिम जनजागृती मार्गदर्शन मेळावा घेऊन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात वनहक्क कायदा २००६, व पंचायत विस्तार अधिनियम १९९६ यावर प्रकाश टाकण्यात आला. वनहक्क कायद्या अंतर्गत सामुहिक वनहक्क, वैयक्तिक वनहक्क लाभ घेऊन जल, जंगल, जमीन, संरक्षणासाठी गाव विकास कृती आराखडा गावाच्या सहकार्याने तयार करून आदिवाशी व आदिम संस्कृती जोपासन्यावर मोलाचे मार्गदर्शन अॅड संजय तिळेवाड यांच्याकडून करण्यात आले. तसेच पंचायत विस्तार अधिनियम १९९६ च्या अंमलबजावणी अंतर्गत गावाला मिळालेल्या निधी गाव विकास करण्याकरिता सहभाग नोंदवावा. रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार निर्मिती करून आदिम जमातीला कसा लाभ मिळवावा यावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन मेळाव्याला अजित जाधव ठाणेदार मुकुटबन, अॅड संजय तिळेवाड वनहक्क व्यवस्थापन झरी तहसील, इरफान शेख दिन बहुउद्देशिय संस्था संस्थापक, राहुल आत्राम शामादादा कोलाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष, हरी रामपुरे, सरपंच कैलास मडावी, उपसरपंच उमेश राठोड, विष्णू मेश्राम, कैलास आत्राम, महादेव आत्राम, तुकाराम आत्राम, पिकू दडाजे भीमराव आत्राम, जगदीश कुमरे व समस्त गावकरी उपस्थित होते.