• पहिल्यांदाच 16 तक्रारींचा निपटारा.
अजय कंडेवार,वणी :- वणी पोलीस स्टेशनमध्ये आता दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार या शनिवारी दि.18 फेब्रु.ला पहिलाच जनता दरबार घेण्यात आला. सदर आयोजन यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोड, पियूष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ.वणी यांचा मार्गदर्शनात वणी ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांचा उपस्थित यात एकूण 47 तक्रारी आल्या त्यात 16 तक्रारीचा निपटारा करण्यात आले.विशेष म्हणजे या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
वणी पोलिस स्टेशनमध्ये जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण दिन दर शनिवारी पाळला जाणार आहे. त्याच धर्तीवर शहर पोलिसांकडून दर शनिवारी सकाळी 11.00 च्या दरम्यान तक्रार निवारण दिवसाचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी पोलीस निरिक्षक प्रदीप शिरस्कर तसेच सहाय्यक पोलिस यांचा माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे निरसने केले जाणार आहेत. तक्रार निवारण दिनी तक्रार दाखल करण्यासह दाखल तक्रारींची कार्यवाहीची माहिती वरिष्ठांकरवी तक्रारदारास दिली जाणार आहे. समोर आलेल्या अर्जानुसार जसे,कौटुंबिक वाद, शेजारच्यांविरुद्ध तक्रारी, हाणामारीचे अदखलपात्र गुन्हे, पोलिसांच्या विरुद्ध असलेल्या तक्रारी, तडजोडी आणि समझोता प्रयत्नही होणार असून, अधिकाधिक तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जाणार आहे. दर शनिवारी भरणाऱ्या तक्रार दिनासाठी तक्रारदारांसह नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर (वणी पोलीस स्टेशन)यांनी केले आहे.
दृष्टिकोन बदलेल आणि गुन्हेगारीला आळा बसेल……..
” अनेकदा नागरिकांकडून येणाऱ्या अर्जावर काहीतरी थातूर मातूर कारवाई करण्यात येत असते. तर, काहीवेळेस यात थोडीफार दिरंगाई होऊ शकते. तक्रारदिनानिमित्त नागरिकांना तक्रारीवर झालेल्या कार्यवाही माहिती दिली जाईल. तसेच नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येतील. या कार्यक्रमामुळे नागरिकांचा दृष्टीकोन नक्कीच बदलू शकेल आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा नक्कीच बसेल अशी बाब देखील यवतमाळ पोलीस अधिक्षक यांनीही व्यक्त केली.”
पोलिसांच्या या उपक्रमामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होईल :-
” पोलिसांना एखाद्या प्रकरणात थेट गुन्हा दाखल करण्याचेही अधिकार असतात. मात्र काही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला, तर त्याचा परिवारावर, नात्यांवर विपरीत परिणामही होऊ शकतो. त्यामुळेच अशी प्रकरणं चर्चेनं सोडवली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंबरनाथ पोलिसांनी सुरु केलेल्या या उपक्रमामुळे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाणही काही अंशी कमी होत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी होतेय. तसेच कोर्टात चक्रा मारण्यापेक्षा समुपदेशन आणि सामोपचारानं प्रकरणं मिटवण्याकडे पोलिसांचाही कल वाढताना दिसतोय.”
सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी पोलिसांचा उपक्रम:-
“सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी पोलिसांचा उपक्रम वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरवर्षी अनेक गुन्हे नोंदवले जातात. एखादा प्रकार घडला, की नागरिक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज घेऊन येतात. यापैकी काही अर्जांची चौकशी होऊन गुन्हे दाखल होतात. तर इतर अर्ज हे अडगळीत जातात. मात्र पोलीस ठाण्यात न्याय मिळेल या अपेक्षेनं आलेल्या कुणालाही रिकाम्या हातानं निराश होऊन परतावं लागू नये, यासाठी वणी पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे….”