•भावाचा स्मृतीदिनीही जपली सामाजिक भावना..
अजय कंडेवार,वणी:- समाजात कळत नकळत माणसाच्या जीवनात असंख्य घटना घडत असतात. काहींवर प्रकाश पडतो तर काही तशाच विरून जातात. अशीच स्तुत्यमय आठवण राजूर गावातीलच समाजसेवक व माजी ग्रा.पं.सदस्य डेव्हिड पेरकावार यांचा कुंटूबियानी केले आहे. शामेल यांची एक आठवण म्हणून दिं 23. जूनला डेव्हिड पेरकावार यांचे लहान बंधू दिवंगत “शामेल पेरकावार” यांच्या स्मृती दिनाचे औचित्यसाधून टिन पत्रे स्वखर्चाने गावातीलच एका दिव्यांगाला भेट वस्तू देण्यात आले.And…… “Perkawar family” gave light to the memories.Social sentiment preserved even on the memorial day of the brother..
दिवंगत शामेल पेरकावार यांच्या स्मृतीदिनाचे औचित्यसाधून डेव्हिड यांनी भावाचा स्मृतीदिनी गावात सामाजिक भावना जपत एक हाथ मदतीचा म्हणून राजूर येथील दिव्यांग जाकीर मौला शेख यांचा घरावर छप्पर टाकण्यासाठी ” टिन पत्रे ” स्वखर्चाने पेरकावार कुटुंबीयांतर्फे भेट स्वरूपात त्यांना देण्यात आले.
यावेळी अशोक वानखेडे (माजी पं.समिती सदस्य),अनिल डवरे,अर्जुन शेनगरपवार व नाना सुरपाम उपस्थित होते.