•जत्रा मैदानात अलोट अश्या गर्दीची शक्यता,पोलिसांचा चोख बंदोबस्त.
•26 वर्षानंतर प्रथमच वणीत प्रेक्षक ऐतिहासिक क्षण अनुभविणार.
अजय कंडेवार,वणी:- संजय खाडे यांचा पुढाकारातून स्व .बाळूभाऊ धानोरकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने शंकरपटाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले. मंगळवारपासून लाखो रुपयांचे बक्षीस असलेला शंकरपटाच्या स्पर्धेला सुरूवात झाली आहे.त्यातला ता.22 फेब्रू रोजी शेवटचा दिवस असल्याने आज खरा विजेता ठरणार आहे.
शेकडो वर्षांची परंपरा असलेला शंकरपट 20 फेब्रु मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवसाचे आयोजन करण्यात आले हा पट बघण्यासाठी हजारावर असलेली गर्दी, त्यासाठी प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त आणि आवश्यकतेनुसार स्वयंसेवक ठेवण्यात आले . प्रेक्षकांच्या नजरा क्षणभरही हलत नव्हत्या. कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यासारखं प्रत्येक जोडीनं सर्वांनाच गोठवून ठेवलं. क्षणोक्षणी रंगत वाढतच राहिली. सामन्यांचं अस्सल मायबोलीत धावतं वर्णन रोमांचित करणारं होतं. एका विलक्षण थराराचा अनुभव देणारा शंकरपट जत्रा मैदानावर धुरळा उडवीत होता. परंतु आज वणीचा इतिहासात 26 वर्षानंतर विजेता ठरणार असल्याने जत्रा मैदानावर अलोट अश्या गर्दीची शक्यता टाळता येणार नाही त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
बैलांच्या किंमती गगनाला भिडल्या…..
“शंकरपट प्रेमी व बैलांचे शौकीन असलेल्यांनी बैल खरेदी-विक्री सुरू केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागात भरणाऱ्या बैल बाजारात शर्यतीच्या बैलांची मागणी वाढली आहे. या बैलाच्या खरेदीसाठी लाखो रुपये बैल प्रेमींकडून मोजले जात आहेत. त्यामुळे बैलाची विक्री लाखो रुपयांना होत आहे. याबरोबरच शर्यतीसाठी बैलांची खरेदी करताना विशिष्ट जातीच्या बैलांची मागणी शर्यत प्रेमींकडून केली जात आहे.”