Monday, April 27, 2026
HomeBreaking Newsअॅड.विजया मांडवकर (शेळकी) अनंतात विलीन.......

अॅड.विजया मांडवकर (शेळकी) अनंतात विलीन…….

Ajay Kandewar,Wani:- विजया विश्वास शेळकी मांडवकर (50) यांचे मंगळवारी रात्री 7.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मूळ गाव राजूर कॉ हल्ली मु.बोधेनगर चिखलगाव येथे कुटुंबीयांसह राहत होते .त्यांना मंगळवारी सं.7.30 हृदयविकाराचा तीव्र धक्का आला होता त्यामुळं त्यांचं निधन झाले.

अॅड.विजया मांडवकर शेळकी राजूर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य देखील होत्या. तसेच वणी न्यायालयात मागील 25 वर्षापासुन सेवेत होत्या.तसेच त्या वणी न्यायालयात मिडिएटरचें कार्य व्यवस्थितरित्या अनेक वर्षापासुन सांभाळत देखील होत्या. शेवटपर्यंत पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या अग्रेसर राहिल्या.त्यांचा पार्थिव शरिरावर 26 मार्च रोजी वणी येथील मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले.अँड. विजया मांडवकर यांच्या निधनाने वकील वर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. “अॅड. मांडवकर यांनी वकिली कार्यक्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने कायदा क्षेत्राची कधीही भरून न येणारे हानी झाली आहे,’ अशी भावना कायदे तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पती, मुलगी व आप्त परिवार आहे. त्यांच्या एकाएकी निधनाने शोक व्यक्त केला जात आहे.

खरच..विजयाताईचा हसमुख चेहरा आज आम्हीं गमविला.संपूर्ण वणी ,पांढरकवडा व यवतमाळ वकिलांना परिचित होते. न्याय क्षेत्रात त्यांचे खूपच मोठे योगदान आहे. चांगले नवीन वकील ही त्यांनी घडविले. त्यांच्या जाण्याने कायदा क्षेत्राचे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. ते आपुलकीने वागत असत. एखाद्या मोठा खटल्यात यश मिळाल्यानंतर आवर्जून फोन करायचे.आज ताई आमच्यात नाही याचं दुःख आम्हास आहे. मी त्यांचा आत्म्यास शांती लाभो हीच ईश्रचरणी प्रार्थना करीतो .- अॅड. निलेश चौधरी ( वकील ,वणी )

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page