Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsअहो...फॅशनेबल साहेब, हा महावितरण ऑफिस की "फिटनेस ट्रेनिंग सेंटर.."

अहो…फॅशनेबल साहेब, हा महावितरण ऑफिस की “फिटनेस ट्रेनिंग सेंटर..”

Ajay kandewar ,Wani:- महावितरणने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्यांच्यासाठी जनतेच्या सोयीपेक्षा स्वतःची ऐट महत्त्वाची आहे. उपविभागीय कार्यालय थेट तिसऱ्या मजल्यावर नेऊन त्यांनी नागरिकांना रोजच्या रोज “फिटनेस ट्रेनिंग”ला लावले आहे. याबाबत युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दखल घेत नागरिकांना वेठीस धरणाऱ्याना सेनेचा “तडाखा” दाखविणार असल्याचे निवेदनात सांगितले.

वीजबिल भरण्यासाठी आलेला शेतकरी असो, तक्रार नोंदवण्यासाठी आलेली गृहिणी असो किंवा चालणंसुध्दा अवघड असलेले वृद्ध व दिव्यांग – सर्वांना आता पायऱ्या चढण्याची शिक्षा ठरलेली आहे. महावितरणला कदाचित वाटत असेल की, वीज मिळो वा न मिळो, नागरिकांची कॅलरी मात्र नक्की जळायला हवी.दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची वसुली करणारी ही संस्था एक साधा लिफ्टचा पर्याय देऊ शकत नाही, हे जनतेसाठी लाजिरवाणं नाही तर उपहासास्पद आहे. “ग्राहक वेळेवर पैसे देतात, पण सोयी मात्र शून्य” हीच महावितरणची खरी ओळख झाली आहे.शासन व महावितरण या दोघांनीही लक्षात घ्यायला हवं की, अशा निर्णयांमुळे जनतेचा विश्वास संपुष्टात येतो, राग उफाळतो आणि चिडचिड वाढते. लोकसेवा करणाऱ्या यंत्रणेनं लोकांना पायऱ्यांवर चढवणं हे केवळ प्रशासनाचा निष्काळजी व भोंगळ कारभार उघड करणारे आहे.महावितरणची वागणूक ही नेहमीच “ग्राहकांनी वेळेवर पैसे द्यावे, पण सोयी-सुविधा मात्र शून्य” अशा प्रकारची असल्याची जनमानसात टीका आहे. जनतेकडून दरमहा लाखो रुपये वसूल करणारी ही यंत्रणा, कार्यालयाच्या ठिकाणी लिफ्ट वा सोयीस्कर व्यवस्था न ठेवता नागरिकांनाच पायऱ्या चढायला लावत आहे, ही खरंच विडंबनात्मक बाब आहे.

•काय आहेत युवासेंनेचा मागण्या…. 

१.महावितरण कार्यालयात जाण्यासाठी लिफ्ट तातडीने सुरु करण्यात यावी.२.लिफ्ट सुरु झाल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, वृद्ध व मजूर वर्ग यांना लिफ्ट वापरण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लिफ्टसमोर कायमस्वरूपी गार्ड / सहाय्यक नेमावा, जे नागरिकांना मदत करू शकेल.३.ग्राहकांना तात्पुरत्या स्वरूपात तळमजल्यावर तक्रारी व बिल भरण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून यावी.४.वृद्ध व महिला ग्राह‌कांच्या सोयीसाठी पाणी, बसण्याची व्यवस्था त्वरित करण्यात यावी.या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास युवासेनेच्या वतीने महावितरण कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments