मारेगाव :- विद्यार्थी दशेत मुलांनी अवांतर वाचन करून स्वतःचा मानसिक विकास घडवून आणावा तरच या देशात उद्याचं सक्षम नेतृत्व तयार होऊ शकते असे प्रतिपादन संजय खाडे यांनी केले मारेगाव येथील राष्ट्रीय विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 5 सप्टेंबरला आयोजित केलेल्या स्वयंशासन उपक्रम यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्करसोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून संजय खाडे बोलत होते ते पुढे म्हणाले आपलं कुटुंब हे जरी महत्त्वाचेअसले तरी आपल्या मनामध्ये देशभक्तीची भावना जिवंत असली पाहिजे. कारण देश आहे म्हणूनच आपण आहोत .
याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या वतीने संजय खाडे यांचा संचालक पद्माकर एकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच संजय खाडे यांनी सामाजिक बांधिलकीची जपणूक करीत शाळेला पाच हजार रुपये किमतीची पुस्तके शालेय ग्रंथालयाकरिता दान दिली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राजेश पोटे प्रमुख पाहुणे संचालक बाबाराव मोरे ज्येष्ठ शिक्षक चेताराम खाडे संचालक पद्माकरजी एकरे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी व्रुदाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन सोनाली जेणेकर यांनी केले तर पाहुण्यांचे आभार दादा गजभे यांनी मानले कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते