•बाहेरील जिल्ह्याचे कनेक्शन आणि स्थानिक प्रशासन मुंग गिळून का ?
•’गब्बरचे ‘ साटे-लोटे उघड लवकरच होणार ?
माणिक कांबळे /मारेगाव :- मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वर्धा नदीवरील कोसारा पुलाजवळ अवैध कोळसा डेपो उभारण्यात आला असून या अवैध व्यवसायातून लाखो रुपयाची उलाढाल सुरु झाली आहे. अशी प्रत्यक्षदर्शी बाब लक्षात आली आहे.विशेषतः बाहेरील जिल्ह्याचे कनेक्शन आणि स्थानिक प्रशासन मुंग गिळून का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.Ouch..!’ Lakhs of manipulation in illegal coal depot at this place.Connection of the outer district and local administration why swallow the groundnut?
मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोसारा जवळील वर्धानदीच्या 200 मिटर अंतरावर चंद्रपूर जिल्ह्यातील काही कोळसा माफिया कडून कोसारा घाटा जवळ कोळशाचा अवैध डेपो उभा करण्यात आला आहे. कोळसा खाणीतून तस्करी झालेल्या कोळसाची अवैध वाहतूक करून या डेपोमध्ये जमा केला जात आहे. त्यानंतर दर दिवशी 50-60 टन कोळशाचा व्यापार करण्यासाठी खैरी ते वडकी मार्गाचा वापर होत असताना आळा घालण्यासाठी आतापर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठया प्रमाणात फोफावला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील एकोना कोळसा खाणीतून लोडींग केलेला अवैध माल काळ्या बाजारात विकण्यासाठी मारेगाव तालुक्यातील कोसारा जवळील वर्धा नदीवरील पुलाजवळ अवैध डेपोमध्ये माल खाली केला जातो त्यानंतर खाली केलेला माल तात्काळ इतरत्र हलविण्यासाठी जिल्ह्यातील जडवाहने वापरली जातात.
कोळसा भरलेला ट्रक खाणीमधून निघाल्या नंतर हा माल रफादफा करण्यासाठी चोरीच्या प्रतीक्षेत असलेले मालवाहू ट्रक लोकेशन वर असतात प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरु असलेल्या या व्यवसायातुन दर दिवशी मोठी उलाढाल होत आहे. चार वैध ट्रक मागे दोन अवैध ट्रॅकच्या मालाची तस्करी केली जात आहे. सुरु असलेल्या अवैध कोळसा तस्करीला आळा घालण्यात यावा अशी मागणी पर्यावरण प्रेमीकडून होत आहे.