Thursday, March 5, 2026
HomeUncategorizedअरेच्चा.... पोकलॅड ने रेती उत्खनन.........!

अरेच्चा…. पोकलॅड ने रेती उत्खनन………!

1 हायवा व 1 मशीन ताब्यात. •महसूल विभाग खूप उशिरा जागा झाला ? •"तो " रेती चोरटा "उमेश" कोण ? उलट सुलट चर्चा.

Ajay Kandewar,वणी :- तालुक्यातील रेती घाट सध्या पूर्णपणे बंद असताना रेती तस्कर ट्रकने रेतीची चोरी करत असल्याची माहिती येथील तहसील कार्यालयास मिळताच वणी तहसीलदार व पथकाने रेती घाटात धाड घालून पाच ब्रास रेतीसह एक हायवा व पोकलॅड मशीन वर जप्तीची कारवाई केली. मात्र, यातील एक ट्रक चालक ट्रक घेऊन पळ काढल्याची घटना रविवारी (ता.6) रोजी घडली.

तालुक्यातील वर्धा नदी पात्रात झोला रेती घाटात सकाळी अचानक वणी तहसीलदार यांनी पाहणी केली असता त्या घाटावर दोन हायवा उभे होते तर जेसिबीच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन करून हायवा क्रमांक MH-40-N-6670 मध्ये रेती भरत असल्याचे आढळून आले. त्याच वेळी महसूल पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्या रेती चोरट्यांना वणी महसुल पथक आल्याचे लक्षात येताच रेती चोरट्यांनी नदीतून वाहनास चंद्रपूर सीमेकडे नेले. अधिकाऱ्यांनी पटाळा पुलावरुन जात एक हायवा व जेसिबी मशीन ताब्यात घेतली. तोपर्यंत रेती चोर वाहन चालकाने एक हायवा ट्रक सह पळून जाण्यास यशस्वी झाला.वणी महसूल प्रशासन काय कारवाई करणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. मात्र या कारवाई मुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

मागील दोन महिन्यांपासून अनेकदा वर्धा नदी झोला घाटावरील उत्खननाच्या बातम्या प्रकाशित झाले. अनेक तस्कर रेती जोमात चोरटी करुन आपला पोटभरू चोरीचा धंधा सूरूच आहे. पण तिथे महसूल विभाग हा न हलायचा.. न झुलायचा ” अशी बिकट परिस्थिती होती.कारण यांनीच मूकसंमती तर दिली नसावी असा प्रश्न जनसामान्यातून ऐकू येत होता.परंतु रविवारी पहाटे महसूल विभागाने कारवाई करून 1 हायवा व 1 मशीन ताब्यात घेतले आणि कारवाई केल्याची धन्यता मानत आहे का? माञ ही कारवाई ताब्यात घेण्यापूर्ती की यातील मुख्य रेती चोरटा कोण? त्या हायव्हा व मशीन कोणाची… यांची नावे महसूल उघड करेल का? की चालक अमुक हाच मुख्य आरोपी म्हणून थातुरमातुर कारवाई करून धन्यता मानेल का ? “आम्ही कारवाई करत आहो असेच प्रशासन दर्शवित राहील का? पळून गेलेला तो ट्रक देखील जप्त करेल का..? किंवा कुठेतरी पाणी मुरेल का ? आणि यात तो “उमेश “कोण याबाबत महसूल विभाग चोकशी करेल का ? या बाबींची जोरदार चर्चा सुरू आहे.असे अनेक प्रश्नांचे कोड अनुत्तरीत आहे.येत्या काळात महसूल विभाग काय ॲक्शन घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page