Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsअरेच्चा..! त्या “गवत्या”वर लाखोंचा दंड..? म्हणजे चोरटा?

अरेच्चा..! त्या “गवत्या”वर लाखोंचा दंड..? म्हणजे चोरटा?

•मोठ्या नाकाने म्हणे — “मेरा प्रचार हो रहा” •गावकऱ्यांचा सवाल — “हा बेशरमपणा की गोलीबाजपणा?”

DESK : गावात सध्या एकच चर्चा रंगली आहे. “गवत्या” नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या व्यक्तीवर एका प्रशासनाने उत्खनन प्रकरणात लाखोंचा दंड ठोठावल्याची चर्चा ही जोरात आहे.सोन्या सारख्या गावाला “त्या चोरट्याने” उत्खनन करून, माती विक्री आणि राजकीय दबाव यामुळे सामान्य लोक त्रस्त झाले. मागील काही वर्षांअगोदर प्रशासनाने कारवाई केली, अशी चर्चा पसरल्यावर गावात उत्सुकता आणि समाधान दोन्ही भावना दिसत आहेत.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की “गवत्या” नावाचा चोरट्या गावात येतो तेव्हा जणू एखादा राजा आल्यासारखा भाव दाखवतो. आमच्याच मातीवर आपली गाडी चालवतो, आणि जेव्हा लोक प्रश्न विचारतात तेव्हा म्हणतो ‘मेरा प्रचार हो रहा’!” एका वयोवृद्ध शेतकऱ्याने संताप व्यक्त करत म्हटले, “प्रचार झाला तरी चालेल, पण तो चांगल्या कामांचा असावा. गावाचा रस्ता उकरून, शेतकऱ्यांची जमीन खोदून मिळालेला पैसा कशाला हवा? आता जर खरंच त्या प्रशासनाने दंड ठोठावला असेल, तर उशीर झाला पण न्याय मिळेल अशीही आशा व्यक्त करत आहे.

काही तरुणांनीही या प्रकरणावर नाराजी दर्शवली. “गावात जेव्हा कोणी नियम मोडतो, तेव्हा साध्या माणसावर लगेच कारवाई होते. पण “गवत्या” सारख्यां गोली बाजवर कारवाई व्हायला किती वेळ लागतो, हे सगळ्यांना काहीं वर्षा अगोदर ठाऊक आहे. त्याची राजकीय मस्ती एवढी आहे की तो स्वतःला मोठा “बादशाह समजतो” पण आहेत “चोरटा”.दरम्यान, प्रशासनाकडून या दंडाची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी गावात चर्चा आहे की दंडाची रक्कम लाखोंमध्ये आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, हे उत्खनन अनेक दिवस चालले, आणि गावातील रस्ते व शेतांची माती खराब झाली.गावातील राजकीय वातावरणही या प्रकरणामुळे तापले आहे. काही लोक म्हणतात, “आता हा दंड त्याच्या राजकीय प्रतिष्ठेवर थेट परिणाम करणार,” तर काहींचं म्हणणं आहे की, “तो याच दंडाचाही ‘ खोटा प्रचार’ करेलच आणि स्वतःला पीडित दाखवेल.”सामाजिक पातळीवरही या घटनेमुळे चर्चा वाढली आहे. अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, अशा चोरट्या उत्खननकारकांवर कठोर कारवाई करून गावाची जमीन व पर्यावरण वाचवावे.

 क्रमशः……शोधा गवत्याकोण…….

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments