Ajay Kandewar,Wani:- बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष यातना देऊन त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या सत्तेतील मंत्र्यावर खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी म.प्र.सरपंच संघटना (वणी )यांनी ग्रामपंचायतचे तीन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले असून २७ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष यातना देऊन त्यांची हत्या करण्यात आली. त्या घटनेला आज जवळपास वीस दिवस होत आहेत. आतापर्यंत मुख्य आरोपी तपासात मिळाला नाही.
पूर्ण बीड, नांदेड, यवतमाळ, परभणी जिल्ह्यातील मराठा समाजाचे संशयित आरोपी असणारे प्रसिद्ध सत्तेतील व्यक्ती व त्यांचे मित्र कराड यांनी पूर्ण बीड जिल्ह्यात दहशत माजवून खुनासारखे, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. प्रशासनावर त्यांची ही दहशत असल्यामुळे त्यांच्यावर कुणाचा गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने बीड जिल्ह्यातील प्रत्येक समाज भयभीत व दहशतीखाली आहे. त्या भागातील बरेच लोक आपल्या मालमत्ता विकून इतरत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरित होत आहेत. वरील घटना ही औरंगजेबाच्या कृतीलाही लाजवेल एवढी अमानुषपणे त्यांच्या एका अवयवाला राक्षसी वृत्तीने डोळ्याला लाईटरने जाळून वेदना दिल्यात. अशा नराधमांना वेळीच बेड्या ठोकल्या पाहिजे .वरील घटना अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांची न्यायालयीन चौकशी करून न्याय देण्यात यावा तसेच गून्हेगाराला अटक करुन फाशी देण्यात यावी अशी मागणी म.प्र.सरपंच संघटना (वणी) यांनी केली आहे तसेच ग्रामपंचायतचे तीन दिवसीय कामबंद आंदोलनचे एल्गार पुकारले. निवेदन देताना वणी तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.