•”या “तालुक्यात एकच खळबळ उडाली.
माणिक कांबळे ,मारेगाव :- शहरात वास्तव्यास असलेल्या एका कुमारी मातेची मध्यप्रदेशात दीड लाख रुपयात विक्री केल्याची घटना मारेगाव येथे समोर आली आहे.एका अमिषापोटी कुमारी मातेचे जीवन नशिबी आलेल्या त्या कुमारी मातेची पुन्हा फसगत झाली आहे. शहरा पासुन काही अंतरावरील एका गावात नाराधमांच्या आमिषाला बळी पडलेल्या एका कुमारी मातेने समाजात सन्माने जगता यावे म्हणून शहराची निवड केली होती. अविवाहित जीवनात अंकुरलेल्या चिमुकलीचे चांगले संगोपन करता यावे म्हणून ती चांगल्या नोकरीच्या शोधात असताना तीची ही गरज लक्षात घेऊन काही भामट्यानी तिच्या संधीचा फायदा घेतला असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.Kidnapping and selling a virgin mother for 1.5 lakhs…There was an uproar in this taluka
महागाईच्या तडाख्यात आर्थिक अडचणीचा सामना करण्यासाठी सुलभ नोकरीं मिळेल का?या प्रश्नाच्या उत्तरात पिडीता चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील रियाबाई एक महिला व गहुकार नावाच्या पुरुषाच्या भावनिक मोहात अडकली. या दोघांनी तीची गरज लक्षात घेऊन तिला कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. ती या अमिषाला बळी पडली त्यांनी सांगितल्या प्रमाणे ती भद्रावती येथे पोहचलीही मात्र येथे नोकरी ऐवजी तिला जेवणातून गुंगीचे औषध देऊन पळविले.
मध्य प्रदेशांतील छिंदवाडा जिल्ह्यातील रतलाम येथील जितू पाली नावाच्या इसमाला त्यांनी त्या दीड लाख रुपयात विक्री देखील केली. या घटनेची माहिती पीडितेच्या आईला होताच तीच्या आईने चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे घटनास्थळ मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास वर्ग केला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून त्या नाराधमाचे विरोधात 365, 366,370,376 भादवी कलमा नुसार गुन्हा कायम करण्यात आला असून ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधात एक पोलिस पथक मध्यप्रदेशकडे रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.