माणिक कांबळे/ मारेगाव :- राज्य महामार्गावरील शिवनाळा बसस्थानकाजवळ अज्ञात वाहणाच्या धडकेत बांधकाम कामगारांचा अपघात झाला यामध्ये हा कामगार जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना 30 जुनचे रात्री 11 .वाजता घडली अनिल कृष्णराव आत्राम (24)शिवनाळा असे अपघातात ठार झालेल्या बांधकाम कामगारांचे नाव आहे.
हे कामगार घटनेच्या वेळी आपले काम आटपवून परतीच्या मार्गांवर असताना राज्य महामार्गावर शिवनाळा बस स्थाब्या जवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली यामध्ये हा कामगार जागीच ठार झाला.दुर्देवी घटने नंतर धडक देणारे अज्ञात वाहन घटना स्थळवरून पसार झाले आहे.घटनेची माहिती मारेगांव पोलिसांना मिळताच घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.ता 1जुलैला उत्तनीय तपासनी नंतर त्याचा अत्यसंस्कार त्याच्या मुळंगावी शिवनाळा येथे करण्यात येणार आहे.
अनिल यांचे पश्चात आई आणि बहीण आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.