▫️”दिव्यांगांकडून सामान्य माणसांनी प्रेरणा घ्यावी.”-गीत घोष
अजय कंडेवार,वणी:– जागतिक दिव्यांग दिनी छत्रपती शिवाजी चौक वणी येथे जनजागरण घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी माया चाटसे (ठाणेदार पोलीस स्टेशन वणी) व मेघराज भंडारी, अर्जुन लोढा इतर मान्यवर, दिव्यांग विद्यार्थी यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर, लुईस ब्रेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लिपटे यांनी केले व प्रास्ताविक सरोज भंडारी यांनी केले. कार्यक्रमांमध्ये सपना वासेकर (साधन शिक्षक ग.सा.के. प. स. वणी ) यांनी दिव्यांगाच्या 21 प्रवर्गा विषयी माहिती दिली तसेच शासनाच्या विविध सोयी सुविधा बाबत मार्गदर्शन केले. तसेच नितेश बावणे (समावेशित शिक्षण तज्ञ ग.सा.के.पं.स.वणी) यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध विषयावर चर्चा करून तेथील उपस्थित पालक वर्ग व शिक्षकांचे मार्गदर्शन केले. तसेच मेघराज भंडारी (संस्थापक – रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय) यांनी त्यांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थी कशाप्रकारे शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यात यशस्वी झाले व रोजगार प्राप्त करू लागले याबद्दल माहिती दिली. अखिल भारतीय हक्क परिषदेचे अध्यक्ष गीत घोष यांनी हेलन केलर आणि लुईस ब्रेल यांच्या बद्दल सविस्तर माहिती विषद केली.कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे व उपस्थित सर्व दिव्यांग विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे आभार प्रदर्शन ढाले (जि. प. प्राथ. शाळा पोहणा) यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गट संसाधन केंद्र पंचायत समिती वणी येथील निकोले (गटसमन्वय ), प्रकाश नागतुरे (माजी ग.शि.अ. तथा केंद्रप्रमुख, प. स. वणी ), देवराव चिडे (साधनव्यक्ती ग.सा.के प. स. वणी )राजेंद्र साखरकर,(शिक्षक) ढाले (शिक्षक ) आसुटकर सर (शिक्षक ) रामटेके (शिक्षक ) तसेच सर्व साधन व्यक्ती व साधन शिक्षक (गसाके प. स. वणी), रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय चिखलगाव येथील शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास दिव्यांग आजी माजी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.