•संजय खाडे यांनी निवेदनाद्वारे भरला कंपनी व्यवस्थापकाला दम……!
अजय कंडेवार,वणी:- उकणी गावासहित परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार तसेच कुशल , अकुशल कामगारांना नौकरीत सामावून घ्या व तसेच अनेक विविध मागण्याकरीता संजय खाडे (माजी उपसरपंच, उकणी) यांचा नेतृत्वात अनेक बेरोजगार युवकांनी आज दिनांक 10 डिसें रोज शनिवारला शाखा व्यवस्थापक इगल प्रा.लि. कंपनी शाखा उकणी व वरिष्ठांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.
गावातील वेकोलि वणी नॉर्थ एरिया व वणी एरिया या एरियासाठी उकणी ओपनकास्ट माईन तसेच निलजई ओपनकास्ट माईन या कोळसा खाणीमध्ये कोळसा काढणे व डंपिंग करण्यासाठी 90% जमिन संपादित केली. त्यामुळे या गावात जो पारंपारिक व्यवसाय हा शेती होता. हा शेती व्यवसाय पुर्णता बंद झाला असून उर्वरित 10% जमिनीमध्ये शेतकरी पिक पेरणी करून सुध्दा या परिसरात मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत आहे. गेल्या 1 महिण्यात नरभक्षी वाघाने दोन व्यक्तीला ठार मारले. त्यात अनेक जनावरेसुध्दा जखमी केले. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आहे. कोणताही मजूर वाघाच्या दहशतीमुळे शेतात जाण्यास तयार नाही.
त्यामुळे शेतक-यावर सुध्दा उपासमारीची पाळी आली आहे. व शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर याचेवर सुध्दा उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे या गावात सुशिक्षीत व कुशल अकुशल युवकांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यात कुटुंबाची उदरनिर्वाहाची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील व परिसरातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात चोरी नशा व इतर वाममार्गाला लागण्याची दाट शक्यता आहे? हा बेराजगाराचा प्रश्न जर वेळेत रोखला नाही तर मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावासहित परिसरातील गावांचे सर्व च्या सर्व सुशिक्षित कुशल अकुशल बेरोजगाराला तात्काळ आपल्या कंपनीत नौकरी देवून कमीतकमी 200 बेरोजगारांना सामावून घेण्यात यावे.
उकणी सहित पिंपपळगाव जुनाडा, बोरगांव, कोलेरा पिंपरी, निळापुर ब्राम्हणी, लाठी बेसा, निवली, तरोडा, निलजई, बेलोरा, मुंगोली या परिसरातील बेरोजगारांना ज्या ज्या कोळसा खाणीमध्ये खाजगी कंपन्या आहे त्यांना 80 टक्के प्राधान्य देऊन नौकरी देण्यात यावे.उकणी गावातील व परिसरातील ज्या युवकांजवळ हेवी ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांना आपल्या कंपनीमध्ये डायव्हर म्हूणन नौकरी देण्यात यावे. तसेच ज्यांच्याकडे हेवी लायसन्स असून सुध्दा वॉल्वो टक्स चालवता येत नाही. अशांना आपल्या कंपनीमार्फत कमीतकमी स्वतंत्र कॅम्प घेउन त्या परिसरातील लायसन्स धारक युवकांना ट्रेनिंग देउन त्यांना ट्रेन करण्यात यावे.
वरीप्रमाणे तिन्ही मागण्यात युवकांना रोजगार आपल्या कंपनीमध्ये 10 दिवसाच्या आत नौकरी देण्यात यावी अन्यथा यानंतर कोणतीही नोटिस न देता दिनांक 21 डिसेंबर 2022 रोज बुधवारला सकाळी ठिक 07.00 वाजता उकणी कोळसाखाणीमध्ये सुरू असलेली ईगल प्रा.लि. कंपनीच्या वॉल्वों द्रक्स सुरू आहे. ते टक्स बंद करणे, तसेच उकणी कोळसाखाण बंद आंदोलन व बोरगांव फाटा येथे चक्काजाम आंदोलन तीव्र स्वरूपात सुरू होईल. त्यात परिसरातील शेकडो बेरोजगार युवकांना तसेच स्थानिक लोकांना घेवून वरिल स्थळावर चक्काजाम आंदोलन केल्या जाईल. यानंतर उदभवणा-या गंभीर परिस्थीला आपली कंपनी वेकोलि प्रशासन व स्थानिक तालुका व जिल्हा प्रशासन तेवढेच जबाबदार रहिल, असा इशारा संबंधित विभाग व संबंधित प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदन देण्यासाठी संजय खाडे (माजी सरपंच उकणी ), नारायण मांडवकर, विलास शेरकि प्रा. टोंगे, बाळासाहेब राजुरकर, राजु धाडे, विठ्ठल खोब्रागडे, निकेश निब्रड, शुभम चिंचोलकर, देविदास चिंचोलकर, जिवन मजगवळी, नत्त्थु पारशिवे, सुधाकर दर्वेकर, अशोक रजपुत, रविंद्र जुनगरी, पांडुरंग धांडे, अविनाश मोडक, विजय लोखंडे, बाळा शिंदे, प्रविण डोंगे, संतोष धांडे व मनोज खाडे आदी निवेदन देतानी मोठ्या संख्येने उपस्थित होते व उकनी परिसरातील असंख्य बेरोजगार युवकांचा सह्या होत्या.