•वणी पोलिस ठाण्याच्या वतीने संपर्क करण्याचे आवाहन मो.9623598979.
अजय कंडेवार,वणी:-वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तहसील आवारात एक अनोळखी इसम आढळल्याची खळबळजनक घटना घडली. त्या इसमाला शासकीय रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी वणी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद दिनांक 21 ऑगस्ट रोजी करण्यात आलेली आहे.
तहसील परिसराचा नवीन सभागृह जवळ एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता त्याची आसपासच्या स्थानिकांद्वारे ओळख अद्यापही पटली नाही.या पुरुषाचा काही प्रमाणातसडलेल्या स्थितीतील मृतदेह सोमवारी (ता. 21 ऑगस्ट) सापडला आहे.सदर व्यक्तीची ओळख पटली नसल्याने आपल्या परिसरात कोणी इसम हरवलेला असल्यास तात्काळ वणी स्टेशनचे जमादार प्रभाकर कांबळे यांना 9623598979 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वणी पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.