Wednesday, August 12, 2026
HomeBreakingअधिकृत बॅनर, प्रोटोकॉल अन् फोनही झाले; तरी वणी विधानसभेचे त्या पदाधिकाऱ्यांची ‘फुगवाफुगवी’...

अधिकृत बॅनर, प्रोटोकॉल अन् फोनही झाले; तरी वणी विधानसभेचे त्या पदाधिकाऱ्यांची ‘फुगवाफुगवी’ का..?

Ajay,Wani:- शिवसेनेचे विदर्भ नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली वणीत झालेल्या भव्य रोजगार मेळाव्याला मोठी गर्दी झाली. भूमिपुत्र, युवक, शेतकरी, प्रकल्पबाधित आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीने कार्यक्रम गाजला. विशेष म्हणजे बच्चू कडू वणीत येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांना आधीपासूनच होती. अधिकृत बॅनरबाजी झाली, पक्षीय प्रोटोकॉलनुसार मान-सन्मान देण्यात आला, तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून कार्यक्रमाची माहिती देण्यात आल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

मात्र, एवढी पूर्वतयारी आणि संपर्क होऊनही वणी विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुकाप्रमुखांसह काही मोठे पदाधिकारी कार्यक्रमात सक्रियपणे दिसून न आल्याने ‘रुसवा फुगवा नेमका कुणाचा?’ हा सवाल आता चर्चेचा विषय ठरला आहे. कारण हा पक्षाचा कार्यक्रम आहे की घरचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीची दबक्या आवाजात चर्चा सुद्धा होऊ लागलेली आहे.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील शिवसेना मजबूत करण्याची जबाबदारी असलेले बच्चू कडू वणीत आले असताना स्थानिक नेतृत्वातील काही प्रमुख चेहरेच मैदानाबाहेर राहणे, हा केवळ योगायोग की अंतर्गत नाराजीचा संकेत, याची चर्चा रंगली आहे.

मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर वणी शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ‘अॅक्टिव्ह मोड’मधील भूमिका मेळाव्याच्या यशामागे महत्त्वाच ठरत आहे. वणी शहरप्रमुख शिवराज पेचे यांच्या नेतृत्वाखालील शहर पदाधिकाऱ्यांची टीम, तसेच दोन्ही उपतालुकाप्रमुख अनिल उल्माले, धीरज राजूरकर आणि शहरातील शिवसैनिकांनी नियोजन, संपर्क, कार्यकर्त्यांची जमवाजमव आणि कार्यक्रमाच्या यशासाठी विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे. जर वणी शहरातील ही टीम सक्रिय झाली नसती, तर तिन्ही तालुकाप्रमुखांसह काही मोठ्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविलेल्या परिस्थितीत बच्चू कडूंचा हा कार्यक्रम नेमका कितपत यशस्वी झाला असता? हा प्रश्न उपस्थित होत आहे. एका बाजूला विदर्भ नेत्याचा भव्य कार्यक्रम आणि दुसऱ्या बाजूला विधानसभा संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती, तर तिसऱ्या बाजूला शहरातील मोजक्या पदाधिकाऱ्यांनी उचलून धरलेला कार्यक्रम या तिन्ही चित्रांमुळे वणी शिवसेनेतील अंतर्गत संघटनात्मक समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आता या संपूर्ण घडामोडीची दखल बच्चू कडू घेतात का आणि पुढील काळात वणी विधानसभा संघटनेबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page