•तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्याला त्याबाबतचे निवेदन सादर.
देव येवले,झरी(वा): या वर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी बाधित शेतकऱ्याला मिळणारा निधी हा योग्य वेळी शेतकऱ्याला मिळावा यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक यांना समप्रमाणात आखून दिलेले काम. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना झरी यांनी हे काम करण्यास नकार दर्शविला असून. त्या बाबतचे निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त अनुदानाचे वाटप करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक यांना आपआपल्या स्तरावर समप्रमाणात गावे वाटून देण्याचे आदेश जिल्हा अधिकारी कार्यालय मार्फत देण्यात आले. मात्र ग्रामसेवकाला गावाच्या विकासाच्या दृस्ठीने, विकास कामाचे नियोजन, ग्रामपंचायत निधी, ग्रामसभा अहवाल, ठरावाची अंमलबजावणी पत्रव्यवहार, शासकीय योजनेचे व्यवस्थापन अश्या अनेक जबाबदार्या पार पाडाव्या लागतात. त्या सोबतच मासिक सभा बोलावणे, त्याच्या नोटीस काढून सबंधीताना देणे, सभेचा कार्य वृतांत लिहिणे सभेत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासह ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामाचा व्याप लक्षात घेता हे काम ग्रामसेवक संवार्गाकडून करून घेणे नैसर्गिक न्यायाला अनुसरून नसल्याने हे काम करण्यास नकार दिला आहे. सबंधित हे काम महसूल विभागाचे असल्याचे हि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना झरी यांनी सदर निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष तुषार यमजलवार, कार्याध्यक्ष प्रतिक कापसे, सचिव मनोज दासरवार, उपाध्यक्ष अतुल सिर्तावार, एम यु पोयाम, कोषाध्यक्ष प्रकाश बळीद, सहसचीव देविदास अडपावर, संघटक गजानन संदावार, महिला संघटक एस जी काळे, एन आर मेश्राम, सल्लागार गिरीश येनगंटीवार, मुनेश्वर कोराम, जिल्हा प्रतिनिधी गणेश मुके, प्रसिद्धी प्रमुख विनोद गिज्जेवार उपस्थित होते.