अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील चिंचोली गावाला लागुन असलेल्या वर्धा नदीचा शिवनी शिवारात कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात 50 वर्षीय महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना शनिवारी (ता.31) रोजी दुपारी 4 वाजताचा सुमारास हा मृतदेह आढळला होता. अवघ्या 48 तासात शिरपूर पोलिसांनी अखेर तिची ओळख पटवली असून मृत महिलेचे नाव चिनक्का राजन्ना नायकाप रा.पोलीस स्टेशन घुगुस हद्दीत शिवनगर येथे राहणारी आहे.सविस्तर वृत्त असे की, मारोती सदाशिव चहारे,पोलीस पाटील रा. चिंचोली ता. वणी जि. यवतमाळ यांनी दि.31 डिसेंबर रोजी दुपारी शेतात गेले असता, गावाला लागून असलेल्या वर्धा नदीचा शिवनी शिवारात एक प्रेत तरंगत दिसले होते. नदीच्या जवळ जावुन पाहीले असता नदीत तरंगत असलेले प्रेत महीलेचे होते. तीच्या अंगावरील कपडे लाल रंगाचे लुघडे व लालसर रंगाचे ब्लाऊज दिसले . त्या अनोळखी महीलेचे अंदाजे वय 50 वर्षांचे होते. ती महीला कुठली आहे ? ती या भागात आली कशी. असा तर्क वितर्क लावले असता आजू बाजूचा परिसरात माहिती घेतली कुठेच थांगपत्ता लागला नव्हता.
शेवटी शोधपत्रिकेचा अनुषंगाने शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड व पोलीस नाईक गजानन सावसाकडे यांनी पोलीस स्टेशन शिरपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस, गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत मयत महिलेचे फोटो दाखवून अनोळखी प्रेत चे नातेवाईकांचा कसून शोध घेतला असता . हाकेचाच अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशन घुगुस हद्दीत शिवनगर परिसरात राहणारी गलगंड असलेली एक महिला मिसिंग असल्याचे समजल्याने शिवनगर परिसरात जाऊन माहिती घेतली असता, त्या महिलेचा मुलाला बोलाविण्यात आले व त्या मुलाने देखील प्रेत आईचेचं असल्याचे सांगितले. तसेच त्या महिलेस झालेला गलगंड फुटल्याने तिला खूप त्रास होत असल्याने तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला गेला आहे. शवविच्छेदन करून मयत महिलेचे प्रेत नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले.