•सततच्या पाठपुराव्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर याना यश.
•नियोजित भारमानापेक्षा कमी झाल्यास बसफेरी स्थगित महामंडळाचा इशारा
सुरेंद्र इखारे, वणी – अखेर वणी ते शिरपूर, शिंदोला मार्गे माथोली बस सुरू झाली आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
वणी ते कैलासनगर अशी बसफेरी सुरू करण्यात आली आहे. परंतु सदर बससेवा ही विद्यार्थ्यांच्या संख्येवर व प्रवासी संख्या या आधारावर सुरू करण्यात आली आहे.पुढे चालून राज्य परिवहन मंडळाचे भारमान नियोजित भारमानापेक्षा कमी झाल्यास सदर बस फेरी स्थगित करण्यात येईल असा इशारा सुद्धा राज्य परिवहन मंडळाने दिला आहे. सततच्या पाठपुरावा केल्यामुळे या निवेदनाची दखल घेऊन वणी आगाराने आज दिनांक 12 सप्टेंबर 2022 ला सकाळी 7.00 वाजता वणी ते कैलासनगर पाठविली आहे त्यामुळे प्रत्येक थांब्यावर बस वाहक व चालकाचे पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला आहे व विद्यार्थी प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे बससेवा नियमित सुरू राहील असे बोलल्या जात होते तसेच महामंडळाने बस चे वेळापत्रक जाहीर केले आहे.
वणी वरून सकाळी 7.00 वाजता त्यानंतर 17.15 वाजता तसेच कैलासनगर वरून 9.00वाजता त्यानंतर 19.15वाजता बससेवा सुरू करण्यात आली आहे. तेव्हा विद्यार्थी पालकांनी व प्रवासी नागरिकांनी जास्ती जास्त प्रमाणात बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य परिवहन मंडळ वणी आगार व माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी केले आहे.