•’संजय खाडे , पुरुषोत्तम आवारी व प्रमोद वासेकर‘ यांना मतदारांनी दाखविली अधिक पसंती.
•काँग्रेस पक्षाला मिळाली मोठी ‘ संजीवनी…..
अजय कंडेवार,वणी:- विधानसभा क्षेत्रातील वणी ,मारेगाव , झरी तालुक्यातील नामांकित वणी येथील ‘ द वसंत जिनिंग ‘ची निवडणूकीचा निकाल काल दिनांक 7 नोव्हेंबर रोजी घोषित झाले. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार यांचे “परिवर्तन पॅनल” ने खूप मोठी गगन भरारी घेत 17 पैकी 15 उमेदवार निवडून येत वसंत जिनिंगचा निवडणुकीत एकतर्फी सत्ता हातात घेतली.
वसंत जीनिंगच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अशा उमेदवारांना उमेदवारी दिली ज्यांचा राजकीय वारसा जपलार आहे ,काँग्रेस पक्षाशी ज्याची नाळ जुळली आहे व कार्यकर्त्यांमधून पक्षाची सेवा देखील केली आहे व शेतकरी कुटुंबातील असल्याने वसंत जीनिंगच्या शेतकरी सभासदांना जाणून घेण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती. शेतकरी सदस्यांचा कल ही भारत जोडो राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून मतदार मतदान केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे . दुसरीकडे विद्यमान आमदार असल्याने वसंत जीनिंगच्या निवडणुकीत आजी माजीतच खरी लढत आहे असे जनसामान्यांत बोलल्या जात होते. परंतू विद्यमान आमदार यांचे पॅनल हे तिसऱ्या क्रमांकावर येऊन ठेपले आहे तर दुसऱ्या क्रमांकावर माजी अध्यक्ष देविदास काळे यांच्या पॅनल राहिले आहे. काळे गटात 17 पैकी केवळ 2 उमेदवार निवडून आले. शेवटी वसंतवर काँग्रेस चे वर्चस्व सिद्ध झाले.
ही निवडणूक अतिशय घमासान झाल्याने ” परिवर्तन पॅनलचे” सर्व उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन वसंत जीनिंगच्या पुढील विकासाच्या कामाची चर्चा केली त्यामुळे मतदारात परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांवर विश्वास टाकून मतदान केल्याचे बोलल्या जात आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित झाला.
वसंत जिनिंग चा निकाल हा काँग्रेस पक्षाला नवीन उभारी देणार असल्याचे जनसामान्यातून बोलल्या जात आहे .परिवर्तन पॅनलचे सक्षम व निवडून आलेले उमेदवार प्रमोद वासेकर, संजयभाऊ खाडे, पुरुषोत्तम आवारी, प्रा शंकर वरहाटे, जयकुमार आबड, घनश्याम पावडे, आशिष खुलसंगे, विनोद गोडे, गजानन खापणे, अशोक धोबे, रवींद्र धानोरकर, साधना गोहोकार, शारदा ठाकरे, राजेंद्र कोरडे हे सर्व होतें .
सर्वाधिक मते मिळविणारे उमेदवार ‘ पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर व संजय खाडे ‘ ….यांना मतदारानी अधिक पसंती दिली आहे ……!!!!!!!!