Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsअक्षय बोथरा ‘टॉप चॉईस’ ठरताच प्रभाग १०च्या बैठका.....

अक्षय बोथरा ‘टॉप चॉईस’ ठरताच प्रभाग १०च्या बैठका…..

अक्षय बोथरा ‘टॉप चॉईस’ ठरताच प्रभाग १०च्या बैठका.....

Ajay Kandewar, Wani :- वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट)कडून उमेदवारांना मिळणारा जबरदस्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. त्यातही प्रभाग क्रमांक १० मधील अधिकृत उमेदवार अक्षय बोथरा यांनी आपल्या कार्यशैलीतून आणि युवाशक्तीच्या बळावर प्रभागातील मतदारांचे आकर्षण वेधून घेतले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार…. कु.पायल तोडसाम

 

अक्षय बोथरा यांचा  युवा चेहरा, दैनंदिन समस्या सोडविण्याची तत्परता, तसेच सर्वसमावेशक नेतृत्वशैली यामुळे प्रभाग १० मध्ये त्यांच्याबद्दलचा कल अधिकाधिक दृढ होत आहे. “नव्या विचारांचे तरुण नेतृत्व प्रभागाला नवे रस्ते दाखवेल” अशी नागरिकांची ठाम भावना असून, त्यांच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच त्याचे बळकट उदाहरण आहे.दरम्यान, प्रभाग क्रमांक १० मध्ये शिंदे गटाकडून समस्यांचा बांधेसूद आढावा घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा आणि तातडीने उपाययोजना आखण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या बैठकींना मिळणारी गर्दी पाहता शिंदे गटाचे संघटन आणि जनाधार आणखी मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रभाग १० मधील अक्षय बोथरा यांच्या लोकप्रियतेसोबतच सक्रिय कामकाजामुळे पक्षाच्या विजयी समीकरणाला निश्चितच बळ मिळत आहे. एकूणच, वणी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाची लाट वाढत असून युवाशक्ती आणि कामकाजाची पारदर्शकता हे त्यांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments