Ajay,Wani: कापसाच्या शेताच्या आड गांजाची लागवड केल्याचा प्रकार शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले सैदाबाद शिवारात उघडकीस आला असून, शिरपूर पोलिसांनी शेतांवर छापे टाकून गांजाची झाडे जप्त केली. पोलीस ठाण्याचे ठाणेदार एपीआय संतोष मनवर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
सुखदेव लेतू आत्राम (वय ५०, रा.सैदाबाद) यांच्या शेतात कापसाचा ओळींमध्ये गांजाची ४१ झाडे आढळली. त्यांचे वजन १९ किलो असून, किंमत अंदाजे २ लाख रुपये आहे.गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून API मनवर यांनी परवानगी घेत छापेमारीचे नियोजन केले. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार API संतोष मनवर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान राजपत्रित अधिकारी ही उपस्थित होते. कायर शिवारात गांजा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, अंमली पदार्थांविरोधात शिरपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईची या प्रकरणी सुखू लेतू आत्राम यांच्याविरुद्ध NDPS कायद्यातील विविध कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुप्त माहितीच्या आधारे तातडीने पथक तयार करून एका ठिकाणी कारवाई करण्यात आल्याने गांजा लागवडीचा प्रकार उघडकीस आला. विशेषतः शिरपूर ठाणे अंतर्गत असे म्हटले जाते की ठाणेदार संतोष मनवरच्या हातातून कोणताही दोन दोन नंबर वाला सुटू शकत नाही अशी चर्चा सुरू आहे.
एपीआय संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखालील प्रशांत झोड, सूरज साबळे, इकबाल शेख, विजय फुलके, अनुप फुलके, दीपक वाकडे, परमेश्वर दराडे, पंकज कुलमेथे व १० होमगार्ड या पथकाने केलेल्या या कारवाईत महत्त्वाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

