Thursday, July 30, 2026
HomeBreakingसंत रविदासांच्या जयंतीनिमित्त भाजप वणी शहर मंडलाच्या वतीने सामूहिक अभिवादन......

संत रविदासांच्या जयंतीनिमित्त भाजप वणी शहर मंडलाच्या वतीने सामूहिक अभिवादन……

Ajay Wani : संत शिरोमणी संत रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहर मंडलाच्या वतीने बुधवारी श्री संत रविदास महाराज प्रबोधन केंद्रात सामूहिक अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा समाजाने स्वीकार करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

संत रविदास महाराज यांनी दिलेला सामाजिक समरसतेचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. समाजात सर्वांना समान वागणूक मिळावी आणि बंधुभाव वाढावा, यासाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष विद्या आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, भाजप वणी शहराध्यक्ष ॲड.निलेश माया महादेव चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे,दीपक पाऊणकर,लक्ष्मण उरकुडे, अनिल चिंडालिया, हितेन अटारा, मनोज सरमुकदम, रोहित वनकर, राजेंद्र साखरकर, गणेश आसूटकर, भारती बदखल, नीता पिदुरकर, बालाजी भेदोडकर, श्रेयस हरणे तसेच लप्रबोधन केंद्राचे अध्यक्ष संभा वाघमारे, दौलत वाघमारे, राजू वाघमारे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page