Sunday, April 19, 2026
HomeBreakingशिंदे सेनेचा "वाघ" पुन्हा धावू लागला........

शिंदे सेनेचा “वाघ” पुन्हा धावू लागला……..

प्रसाद व शिवा यांवर मोठा "विश्वास". •गटाला एक नवी ऊर्जा मिळाली.

Ajay Kandewar, Wani:- वणी विधानसभेतील राजकीय समीकरणात पुन्हा एकदा हालचाल सुरू झाली आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर यांना काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने जिल्हा समन्वयक पद देताच गटाला एक नवी ऊर्जा मिळाली होती. मात्र त्यानंतर वातावरण शांत झाल्यासारखे वाटत होते. पण आता वणी तालुकाध्यक्ष प्रसाद ठाकरे व शहराध्यक्ष शिवा पेचे यांना हे पद बहाल होताच “विश्वास ” पुन्हा एकदा “शिंदे सेनेचा वाघ धावू लागला” अशी चर्चा राजकारणात रंगू लागली आहे.

स्थानिक राजकारणात प्रसाद ठाकरे यांच्या नेमणुकीमुळे शिंदे गटाचे बळ अधिक वाढल्याचे मानले जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून विरोधकांमध्ये मात्र अस्वस्थता दिसून येते आहे. गावोगावी वाढणारी चळवळ आणि कार्यकर्त्यांची उसळणारी गर्दी यामुळे शिंदे गटाचा घरातला ओघ आता खेड्यातील ओघ वळतोय अशी राजकीय चर्चेला जोर चढला आहे.

येत्या काळात किती नेते-कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होणार, कोण कोण तिकडे वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जणांचे नावं चर्चेत असून, निर्णय केवळ वेळेची प्रतीक्षा असल्याचे म्हटले जात आहे. बैठका, तरुणांची गर्दी, महिलांचा वाढता सहभाग आणि स्थानिक स्तरावरच्या नेत्यांच्या हालचालींमुळे शिंदे गटाचे बळ सातत्याने वाढताना दिसते आहे. विरोधकांकडून मात्र या नव्या घडामोडींवर “सावध पण तणावग्रस्त” अशीच प्रतिक्रिया उमटते आहे.एकंदरीत, वणी विधानसभेचं राजकारण पुन्हा एकदा “शिंदे विरुद्ध बाकी” या रेषेवर उभं राहिलं आहे. वाघाची गर्जना आता किती दूरवर पोहोचते आणि त्याला किती हात उंचावून प्रतिसाद मिळतो, हे पाहणं येत्या दिवसांत अधिक रंजक ठरणार आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page