Tuesday, November 24, 2026
HomeBreakingविदर्भ न्यूजचा दणका..! २० रुपयांच्या वसुलीची पहिला रट्टा....रास्तभाव दुकानाचा परवाना थेट रद्द.....

विदर्भ न्यूजचा दणका..! २० रुपयांच्या वसुलीची पहिला रट्टा….रास्तभाव दुकानाचा परवाना थेट रद्द…..

Ajay Kandewar,Wani:- रेशन कार्ड ई-केवायसीच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून २० रुपये आणण्याचा संदेश थेट व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकणाऱ्या वणीतील रास्तभाव दुकानदाराला अखेर प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. २२ ऑगस्ट २०२६ रोजी विदर्भ न्यूजने या प्रकाराचा भांडाफोड करताच प्रकरणाने वेग घेतला. नागरिकांनी पाठविलेल्या व्हॉट्सॲप संदेशाच्या स्क्रीनशॉटसह विदर्भ न्यूजने हा प्रकार जनतेसमोर आणला. त्यानंतर हुंकार संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे  युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल करून कागदपत्रांसह पाठपुरावा केला. प्रशासनाच्या चौकशीत संबंधित दुकानातील अनियमितता समोर आली आणि दुकानदाराचे स्पष्टीकरणही समाधानकारक ठरले नाही

जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ यांनी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पारित केलेल्या आदेशाने वणी वार्ड क्रमांक ११ मधील बुंद बहुउद्देशीय महिला बचत गटाच्या रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. एवढ्यावरच प्रशासन थांबले नाही, तर महाराष्ट्र अनुसूचित वस्तू (वितरणाचे विनियमन) आदेश १९७५ मधील तरतुदींच्या उल्लंघनाप्रकरणी संबंधित दुकानदाराची १०० टक्के अनामत रक्कम दंड म्हणून वसूल करण्याचाही आदेश दिला आहे. म्हणजेच स्वस्त धान्य दुकानाच्या नावाखाली मनमानी करणाऱ्यांना प्रशासनाने थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

२० रुपयांच्या कथित वसुलीचा विषय समजून दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी हा आदेश चपराक आहे. व्हॉट्सॲपवर टाकलेला एक संदेश, नागरिकांनी पाठविलेला स्क्रीनशॉट आणि विदर्भ न्यूजने केलेला पर्दाफाश यानंतर अजिंक्य शेंडे यांनी केवळ आरोप करून न थांबता कागदोपत्री लढा दिला. अखेर दुकानाचा परवाना रद्द झाला आणि अनामत रक्कम दंडाच्या कचाट्यात आली. ही कारवाई म्हणजे बातमीला पुराव्याची जोड आणि पाठपुराव्याला प्रशासनाची कृती मिळाली तर मनमानी करणाऱ्यांची गय होत नाही, याचा ठोस दाखला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page