Ajay,Wani:- वणी शहरातील बिर्याणी सेंटरवर LCB पोलिसांनी छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोमांस विक्रीच्या संशयावरून पोलिसांनी धाडसत्र राबविल्याची माहिती समोर आली असून, कारवाईदरम्यान बिर्याणी सेंटर चालकांची धावपळ उडाल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे संबंधित बिर्याणी सेंटरमध्ये नेमका काय प्रकार सुरू होता, याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
गोमांस विक्रीच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता बिर्याणी सेंटरमधील मांसाचा प्रकार, त्याचा स्रोत आणि विक्रीसंदर्भातील बाबी तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. बिर्याणीच्या नावाखाली नेमके कोणत्या मांसाची विक्री होत होती, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे तपासातून कोणती माहिती उघड होते, याकडे लक्ष लागले आहे.पोलिसांकडून चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया तपासाच्या निष्कर्षांनुसार होणार आहे. छापा पडला, चौकशी सुरू झाली; आता पोलिसांच्या तपासात नेमके काय उघड होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वणी शहरात सध्या तीन बिर्याणी सेंटरवर धार पडली अशी माहिती मिळालेली आहे.

