Saturday, April 18, 2026
HomeBreaking Newsवणी मतदारसंघात "काँग्रेसला" नवसंजीवनी देणारे कणखर नेतृत्व "संजय खाडे" 

वणी मतदारसंघात “काँग्रेसला” नवसंजीवनी देणारे कणखर नेतृत्व “संजय खाडे” 

•भिडणारा नेता काँग्रेसला कित्येक वर्षांनी लाभला.

Ajay kandewar,Wani : दीर्घकाळापासून पक्षांतर्गत गटबाजी, तडजोडीचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ओढाताण यामुळे काँग्रेस पक्ष हळूहळू मरगळलेल्या अवस्थेत दिसत होता. कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते. ‘काँग्रेसला आता कोण उभारी देणार? हा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात सतावत होता.मात्र या अंधारात आशेचा किरण ठरावा असा एक कणखर नेता वणीमध्ये  संजय खाडे या स्वरूपात उभा राहिला आहे. जनतेचे प्रश्न रस्त्यावर उतरून सोडवणारा, प्रशासनाविरुद्ध धडक देणारा आणि पक्षासाठी निष्ठावंत कार्यकर्ता फळी उभी करणारा हा नेता आता काँग्रेससाठी जीवनदान ठरतो आहे.बराच काळ वणी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा, संभ्रम आणि मरगळ होती. “नेतृत्वच नाही, दिशा नाही, आणि पक्षाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली” अशी चर्चा कार्यकर्त्यांच्या तोंडी होती. पण आता अचानक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. कारण काय? तर संजय खाडे हे नाव!

काँग्रेसला जिवंत ठेवणारे, नवसंजीवनी देणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करणारे कणखर नेतृत्व अखेर वणी मतदारसंघात उभं राहिलं आहे. रस्त्यांपासून रोजगारापर्यंत, शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत जनतेचे प्रश्न घेऊन थेट प्रशासनाला भिडणारा नेता काँग्रेसला कित्येक वर्षांनी लाभला आहे.

 कार्यकर्ता फळी निर्माण करणारा नेता

आजच्या राजकारणात पैसा, सत्ता आणि पदासाठी झगडणाऱ्यांची कमी नाही; परंतु जमिनीवरची कार्यकर्त्यांची फळी उभी करणारे नेते दुर्मिळ झाले आहेत. या नेत्याने मात्र गावोगाव कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. कार्यकर्त्यांना स्वतःची ताकद असल्याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळेच वणी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते नव्या जोमाने पुढे येत आहेत.

जनतेच्या प्रश्नांवर आघाडी

रस्त्यांची दुरवस्था, शेतीचे प्रश्न, रोजगाराची कमतरता, शैक्षणिक सुविधा, प्रशासनाची दिरंगाई – या प्रत्येक विषयावर हा नेता थेट रस्त्यावर उतरून लढा देत आहे. ‘जनतेचा नेता’ अशी ओळख तयार झाल्याने सामान्य माणसामध्ये काँग्रेसबद्दल विश्वास परत वाढतो आहे.

 

🔹काँग्रेससाठी आशेचा किरण

आजच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला दमदार नेतृत्वाची नितांत गरज होती. अखेर वणीमध्ये असा नेता उभा राहिला आहे जो कार्यकर्त्यांना संघटित करतो, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतो आणि पक्षाला नवा श्वास देतो. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये आता चर्चा सुरू आहे की – “हा नेता काँग्रेसचा तारक ठरणार!”काँग्रेसला टिकवायचे असेल, पुन्हा जनतेत विश्वासार्हता निर्माण करायची असेल तर अशाच कणखर नेतृत्वाला पुढे आणणे गरजेचे आहे. वणीतील हा नेता आज पक्षासाठी ‘जीवनदान’ ठरला आहे. पुढील काळात त्याच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा कार्यकर्ते आणि जनतेत पसरत आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page