Ajay Kandewar,Wani:: वणी शहरात सोशल मीडियावरील एका साध्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे समाजोपयोगी कार्याला हातभार लागल्याची प्रेरणादायी घटना वणीत घडली आहे. येथील डॉ. सचिन दुमोरे यांनी सायकल उपक्रमाबाबत व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस राकेश कुमार यादव यांनी पाहिल्यानंतर त्यांनी एक अनोखा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला.

राकेश कुमार यादव यांच्या मुलीला पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात प्रवेश मिळाल्याने तिची सायकल वापरात नव्हती. अनेकजण अशा वेळी सायकल विकण्याचा विचार करतात; मात्र “ही सायकल एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकते,” असा सकारात्मक विचार करत त्यांनी ती सायकल विकण्याऐवजी थेट ‘स्माईल फाउंडेशन’ला दान केली.
या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होणार असून, समाजात सकारात्मक संदेशही पोहोचत आहे. सामाजिक बांिलकी जपत केलेल्या या दानकार्याबद्दल स्माईल फाउंडेशनतर्फे राकेश कुमार यादव यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

