अजय कंडेवार,वणी :- शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या चारगाव चौकी मार्गावर अवैधरित्या वाहतूकीत जाणाऱ्या गोवंश तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला असून घटनास्थळावरून 20 लाख रू कंटेनर वाहन व 6 लाख 80 हजार रुपये किमतीचे 34 नग गोवंशाची सुटका करून स्पॉट वर एका आरोपीला अटक करीत एकूण 26 लाख रु 80 हजार रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शिरपूर ठाणेदार संतोष मनवर यांची टीम कर्तव्यावर असताना शिरपूर ते चारगाव चौकी मार्गावर एका कंटेनर मध्ये जनावरांना घेऊन जात असल्याची माहिती API संतोष मनवर यांना मिळाली. त्यावरून API मनवर यांचा चमूने चारगाव चौकी मार्गेजाणाऱ्या रस्त्याजवळ सापळा रचून 1 ईसम हे 34 गोवंशीय जनावरांना कंटेनर वाहन क्र.(NI 01-AG- 1288) वाहनात जनावरांना नेत असतांना वाहन चालक सरगम गुलाबसिंग धुर्वे याने नागपूर येथील तोसिक अहमद आणि गडचांदूर येथील इरफान यांच्या सांगण्यावरून ही गोवंश वाहतूक केली जात असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना दिली.

शिरपूर पोलिसांनी जनावर तस्करांच्या ताब्यातून 34 गोवंश बैलांची सुटका करून चारापाण्या व्यवस्था नसल्यामुळे गोरक्षण ट्रस्ट येथे पाठविले. महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांच्या कत्तलीवर प्रतिबंध असताना कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करणारे संशयितांविरुद्ध प्राण्यांचा क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम चे कलम 11(1),(D)11(1)(E),11(1)(H) व अधिनियम कलम 5 (À), 5 (B), 9, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119, व 83 ,184/177 वाहन कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठ SP कुमार चिंता ,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे आदेशानुसार Dysp सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर ठाणेदार API संतोष मनवर यांच्या सूचनेनुसार PSI गुल्हाने, इकबाल शेख, अविनाश बानकर व अन्य पोलिस यांनी पार पाडली.


