Tuesday, April 21, 2026
Homeवणी"त्या……" माणसाने कितीही उंची गाठली तरी त्याचे पाय जमिनीवरच .

“त्या……” माणसाने कितीही उंची गाठली तरी त्याचे पाय जमिनीवरच .

•शहरातील युवकांकडून इरशाद खान यांचा वाढदिवस साजरा…!

अजय कंडेवार,वणी –‘माणसाने कितीही उंची गाठली तरी त्याचे पाय जमिनीवर असायला हवेत! ही म्हण शहरातील इरशाद खान (राज्य उपाध्यक्ष- मनसे वाहतूक सेना) यांचात स्पष्ट दिसून येते असे युवकांचे म्हणने आहे.समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन जमेल तितके त्यांच्या आयुष्यात आनंद पेरत राहावे,’ अश्या सुंदर विचाराचे , अत्यंत साध्या स्वभावाचे व समस्त युवकांचे आवडते इरशाद खान (राज्य उपाध्यक्ष- मनसे वाहतूक सेना) हे आहेत. सोमवारी वणी शहरातील अनेक युवकांनी इरशाद खान यांचा वाढदिवसानिमित्य सामाजिक भावना जोपासत विविध उपक्रमांच्या माध्यमातून आनंदाचे झाड पेरले ! जसे की,कुठे अन्नदान तर कुठे केक कटिंग आयोजित करून साधेपणाने सामाजिक भान जपत एक उत्तम उदाहरण सार्थक केले!

बघा……!

इरशाद यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यासाठी समस्त युवकांनी पुढाकार घेतला. वाढदिवसाचे औचित्य शहरातील प्रत्येक प्रभागात अनेक कार्यक्रम पार पडले. यानिमित्त समाजातील गोर – गरिबांना मदत, युवकांना मार्गदर्शन, अन्नदान व केक कटिंग यासारखे उपक्रम राबविण्यात आले.विशेषतः परिसरातील अनेक युवक आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना देखिल मोठा प्रतिसाद मिळाला.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page