Ajay, Wani : झरि तालुक्यातील मुकुटबन परिसरात सुसाट चालणारा कथित मटका व झेंडीमुंडीच्या व्यवसायांबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता एक वेगळाच प्रश्न जोडला गेला आहे. दोन ठिकाणचे धंदे बंद झाल्याची चर्चा असताना कथित‘नू”**र’ नावाने चर्चेत असलेला कथित मटका व झेंडीमुंडीचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा का कायम आहे.तर त्याला नेमक कोणत्या “गेंडूरगिटक्या”च्या परवानगीने जोमात सुरू आहे.
मटका किंवा झेंडीमुंडीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी कायदेशीर परवानगीची तरतूद आहे का? नसेल, तर हा कथित व्यवसाय सुरू असल्याची माहिती असूनही तो थांबविला का जात नाही? आणि जर कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगीच नसेलच, तर ‘नू***र’च्या कथित नावाने सुरू असलेल्या या धंद्याला कोणत्या आधारावर मोकळीक हवा कोण देत आहे.दोन ठिकाणी धंदे बंद होतात आणि एका ठिकाणी मात्र सुरू राहते, त्यामुळे ‘परवानगीचे वेगळे मापदंड आहेत का असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.विशेष म्हणजे ‘नू***र’च्या कथित अड्ड्याला परवानगी देणारा कोणी असेल तर तो कोण? अधिकृत परवानगी असेल तर तिचा आधार काय? आणि परवानगी नसेल तर धंदा पूर्णपणे बंद का नाही? या तीन प्रश्नांची उत्तरे आता मुकुटबन पोलिस प्रशासनाकडून अपेक्षित आहेत. यावर विदर्भ न्यूज देखील I.G ,S.P व Dysp या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती विचारणार असल्याची माहिती मिळाली आहे.
‘नू****र’च्या कथित मटका धंद्याने सामाजिक वातावरण बिघडण्याचा धोका…..
मटका व झेंडीमुंडीच्या कथित धंद्यामुळे परिसरातील तरुण आणि सर्वसामान्य कुटुंबांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा धंद्यांमुळे आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद तसेच सामाजिक वातावरण बिघडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ स्थानिक पातळीवरील बाब म्हणून न पाहता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन ‘नू**र’च्या कथित धंद्या मुकूटबन ठाणेदार यांना आदेश देऊन कारवाई नाही तर तात्काळ बंद करावा.

