Friday, May 1, 2026
Homeवणीजनता विद्यालय येथे पालक शिक्षक सभा….

जनता विद्यालय येथे पालक शिक्षक सभा….

सुरेंद्र इखारे,वणी :- जनता विद्यालय वणी येथे दिनांक 25 ऑगस्ट 2022 ला पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चा करण्यात आली. या सभेमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना सुद्धा करण्यात आली .
या सभेत अध्यक्ष जी एस खंडाळकर( मुख्याध्यापक) हे होते तर उपाध्यक्ष म्हणून संतोषी नार्लावार यांची निवड करण्यात आली. शिक्षक सचिव म्हणून बोबडे सर ,सहसचिव पालकांमधून रमाकांत डोडेवार तर सहसचिव शिक्षकांमधून जे के गोरे यांची नेमणूक करण्यात आली. सभेला अनेक पालक वर्ग आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

या सभेत खंडाळकर मुख्याध्यापक , जांभुळकर उपमुख्याध्यापक ,जोगी पर्यवेक्षिका , मांडवकर , चवले ,गोरे, उपाध्यक्ष संतोषी नार्लावार, सहसचिव रमाकांत डोडेवार यांनी मार्गदर्शन केले तर या सभेचे संचालन लेडांगे, प्रास्ताविक पोडे तर आभार प्रदर्शन माशिरकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page