Wednesday, July 15, 2026
HomeBreaking Newsओ साहेब... त्यासाठी एक बुलडोझर पुरेसा नाही हो.....

ओ साहेब… त्यासाठी एक बुलडोझर पुरेसा नाही हो…..

•वेकोली प्रशासन अजूनही ढिम्म. •निळापूर-गोवारी शिवारात वाघाची दहशत, मनसेचा इशारा.

Ajay kandewar,Wani : निळापूर-गोवारी शिवारात वाघाचा वाढता वावर व या झोपेत असलेल्या वेकोली प्रशासनाचा जागेत मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे, झुडपे याला विशेष कारणीभूत असून शेतकरी व ग्रामस्थांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. शेतकऱ्यांना शिवारात जाण्यासाठी जीव मुठीत धरावा लागत असून, उपजीविकेवरही या परिस्थितीचा थेट परिणाम झाला आहे. तरीही वेस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेड (WCL) प्रशासन झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. म्हणून मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी थेटवेकोली उपक्षेत्रीय प्रबंधक यांना तातडीचे उपायोजना करण्याकरता निवेदन दिले.

अलिकडेच वाघाने शेतकरी पंढरी कळसकर यांच्या गायीवर हल्ला करून तिला ठार केले. ही घटना भविष्यातील गंभीर जीवितहानीचा इशारा देणारी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या भीतीसोबतच त्यांच्या रोजीरोटीलाही थेट फटका बसत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

•“झोपेत की कोमात?” – गोहोकारांचा सवाल

या गंभीर धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी WCL च्या उपक्षेत्रीय प्रबंधकांना निवेदन दिले आहे. “झुडपांचे जंगल तयार करून वन्यप्राण्यांना शिवारात आमंत्रण देणारे विकोली अधिकारी झोपेत आहेत की कोमात?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.मनसे तालुकाध्यक्ष गोहोकारांनी स्पष्ट केले की, “वेकोलीच्या दुर्लक्षामुळेच वाघाचा वावर वाढला आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली, तर त्याला जबाबदार वेकोलीच राहील.निवेदनानंतर WCL प्रशासनाने एक बुलडोझर लावून झुडपे काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, गोहोकारांनी एकच बुलडोझर पुरेसा नसल्याचे सांगत अधिक यंत्रसामग्री लावण्याची मागणी केली. त्यांनी इशारा दिला की, “मंगळवारपर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ न झाल्यास गुरुवारी ग्रामस्थांसह मोठे जनआंदोलन उभारले जाईल. निवेदन देताना अनेकांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page