Ajay Kandewar,Wani:- वणी नगरपरिषदेत अखेर स्थैर्य आणि स्पष्ट नेतृत्वाचा अध्याय सुरू झाला असून नगराध्यक्षपदाची शपथ विद्या आत्राम यांनी घेतली. बहुमताच्या बळावर भारतीय जनता पक्षाने नगरपरिषदेत आपली पकड अधिक मजबूत करत प्रशासनाला दिशा देणारा निर्णय घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.नगरपरिषदेत बराच काळ चर्चेत असलेला उपाध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून भाजपाने सामाजिक समतोल, अनुभव आणि युवा नेतृत्वाचा योग्य समन्वय साधत निर्णय घेतला आहे. कुणबी समाजाचे प्रखर, अभ्यासू आणि सर्वमान्य व्यक्तिमत्त्व लक्ष्मण उरकुडे यांना अडीच वर्षांसाठी उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली असून उर्वरित पहिल्या अडीच वर्षांसाठी युवा चेहरा राकेश बुग्गेवार यांना उपाध्यक्षपदावर स्थान देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे वणी शहरात सकारात्मक चर्चा सुरू असून, “अखेर कुणबी समाजाच्या चेहऱ्याला संधी देत भाजपाने मानही दिला” अशी भावना सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. भाजपाने केवळ राजकारण न करता समाजातील घटकांना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका घेतल्याचे यावरून अधोरेखित झाले आहे.“भाजपाने कुणबी समाज्याचा चेहऱ्याला उपाध्यक्षाचा दिलेला मान हा मोठा बहुमान आहे” असे बोलले जात आहे.यासोबतच स्वीकृत सदस्यांच्या निवडीतही भाजपाने ठोस निर्णय घेत किशन खुंगर, रवी बेलूरकर आणि उबाठा गटाचे शत्रुघ्न मालेकर यांना संधी देण्यात आली.
नगरपरिषदेत अनुभव, विश्वासार्हता आणि संघटनात्मक ताकद वाढवली आहे. या नियुक्त्यांवरही भाजपाची स्पष्ट मोहर उमटलेली दिसून येते.एकूणच वणी नगरपरिषदेत भाजपाने बहुमताचा योग्य वापर करत नेतृत्व, समाजसमतोल आणि प्रशासन यांचा समन्वय साधला असून आगामी काळात शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भाजपाचा हा निर्णय केवळ सत्तेचा नाही तर विश्वासाचा, मानाचा आणि स्थैर्याचा असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

